पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*माजी नगरसेवक सोमाशेठ जाधव आणि विक्रमभैय्या यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून २,००० कुटुंब सावरली...*
सातारा जिल्ह्यातील सोमवार पेठ या जागेवरील अनेक कुटुबांना रोजंदारीवर त्यांचे आयुष्य काढावे लागते. रोज काम केल्यावरच त्यांना दिवसाचा पगार मिळतो. पण आता तो पगार मिळणं ही कठीण होऊन बसले आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. या महामारीतून सुटका होण्यासाठी आपल्या देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे प्रत्येकजण जिथे आहे तिथेच राहणे गरजेचे आहे, संचारबंदी करण्यात आली आहे. असे असताना, रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबाचे मात्र हाल होत आहेत. पण या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले माजी नगरसेवक सोमाशेठ जाधव आणि विक्रमभैय्या. या दोघांनी मिळून सोमवार पेठेतील २,००० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. या मदतीमुळे त्या कुटुंबांच्या आयुष्यात एक नवी उमेद नक्कीच निर्माण झाली असावी.