पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला संचार बंदीचा निर्णय*
-विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर
▪️नागरिकांनी सहकार्य करावे.
▪️आपल्या सर्वांच्या हितासाठी हा निर्णय.
▪️कडक अंमलबजावणी करणार .
पुणे, दि.७:कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव पाहता पुण्यातील काही भागात प्रतिबंधित क्षेत्र जारी करण्याचा व कडक संचार बंदीचा निर्णय घेतला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
अधिक माहिती देताना डाॕ.म्हैसेकर म्हणाले,काल पुणे मनपा प्रशासनाने कांही भाग सील करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली.
बैठकीस पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते.
अधिक माहिती देताना ते म्हणाले ,शहरातील एरिया निश्चित करण्यात आले आहे..या संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.तथापि सकाळी १० ते १२ या वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सूट देण्यात येईल .मात्र गर्दी केल्यास पुन्हा दुकान बंद करण्यात येईल.पिंपरीचिंचवड मनपा क्षेत्रातील पडवळनगर,खटावाडी,चिखलीमधील घरकुल भागही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जारी करण्यात आले आहे.
ही संचार बंदी आपल्या सर्वांच्या हितासाठी घेण्यात आली आहे.नागरिकांनी सहकार्य करावे ,असे आवाहन डाॕ.म्हैसेकर यांनी केले आहे.
--------+++-+