पुणे प्रवाह न्युज पोर्टल
१९९२ नंतर प्रथमच चीनच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक
मुंबई, १९ एप्रिल २०२०: आपला शेजारी देश आणि कोव्हिड-१९ च्या उद्रेकाचे मूळ केंद्र असलेल्या चीनच्या समग्र अर्थव्यवस्थेचे चित्र समोर आले आहे. एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की कोरोना व्हारसचा प्रभाव, लॉकडाउन, उत्पादन ठप्प याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर प्रत्यक्ष परिणाम झाला असून ती आकुंचन पावली आहे. १९९२ पासून ही पहिलीच तिमाही आहे, ज्यात चीनच्या अर्थव्यवस्थेने नकारात्मक चित्र दर्शवले आहे. जाहीर झालेल्या माहितीनुसार, चीनचा जीडीपी २०२० या अखेरच्या आर्थिक वर्षात ६.८ टक्क्यांनी घसरला.
चिनी गुंतवणुकीचे सेबीकडून मूल्यांकन:
एक महत्त्वाची घटना म्हणजे सेबीने गुरुवारी पाकिस्तान, उत्तर कोरिया, इराण, तैवान, म्यानमार आणि इतर आशियाई देशांतील ‘लाभार्थी मालक’ असलेल्या ऑफशोअर फंडाचे वर्गीकरण करण्याची विनंती केली. यांना चीन सरकारचा पाठिंबा असण्याची शक्यता आहे. चिनी आणि हाँगकाँग आधारीत एफपीआयची तपासणी करण्यासाठी हा पाठपुरावा केला जात आहे.
भारतीय शेअर बाजारासाठी पर्फेक्ट फ्रायडे :
भारतीय शेअर बाजारासाठी शुक्रवार हा एक 'परफेक्ट फ्रायडे' ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही ३ टक्क्यांहून अधिक वृद्धी दर्शवली. कोव्हिड-१९ला रोखणे 'रीमेडिसविर' (remdesivir) या औषधामुळे शक्य होऊ शकते, या बातमीने तसेच आरबीआयच्या घोषणेने बाजारात सकारात्मक चित्र दिसले. तसेच भारत सरकार प्रोत्साहनपर पॅकेजवर अंतिम फेरीत काम करत असून त्याची घोषणा कधीही होऊ शकते. या सर्व बाबींमुळे बाजारासाठी आवश्यक गती मिळाली तसेच यामुळे नकारात्मकतेचे पारडे हलके झाले.