जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी*

पुणे प्रवाह न्युज प्रवाह पोर्टल


 


*जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी*


*पहिल्या टप्प्यात 42 हजार मास्कचे वितरण*
                
*जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती*



            पुणे दि.22:- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन लाख ट्रिपल लेअर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी  नवल किशोर राम यांनी दिली आहे.


    पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासाठी दहा हजार मास्क, तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासाठी सात हजार मास्क तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाला दहा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत. याबरोबरच सर्व तहसिलदार कार्यालयांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे पंधरा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत.


 पहिल्या टप्यात एकुण 42 हजार मास्क वितरीत करण्यात येत आहेत.  उर्वरित मास्क टप्याटप्याने सर्व संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.


0000000