पंचप्राण हेल्पलाइन"- शेतकऱ्यांसाठी*

*"पंचप्राण हेल्पलाइन"- शेतकऱ्यांसाठी*


सध्याच्या कोरोना संकटातुन बाहेर पडल्या नंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सध्याच्या दिवसाला बारा वरून खुप वाढण्याची भिती आहे.


एखादा शेतकरी डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्येचा विचार करू लागला तर त्याला त्वरित मानसिक आधार, दिलासा दिला व प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग दाखवला तर त्या अवघड प्रसंगातून तो बाहेर पडून त्याचे मनोबल वाढेल व तो परिस्थितीशी सामना करेल.
जसे एखाद्या माणसाला हार्ट ॲटॕक आल्यावर तातडीच्या उपचारांची गरज असते व नंतर काही उपाययोजना कराव्या लागतात. त्याच धर्तीवर.


जेव्हा शेतकऱ्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार तीव्रपणे बळावतो, तेव्हा त्याला तात्काळ भावनिक आधाराची गरज असते. 


*म्हणून आम्ही "पंचप्राण हेल्पलाइन" हा नाविण्यपुर्ण उपक्रम सुरु करीत आहोत.* अशी नाजूक परिस्थिती निर्माण झाल्यास प्रत्यक्ष शेतकऱ्याने किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईक, मित्र व हितचिंतकाने आम्हाला संपर्क केल्यास त्याबाबत कृती करण्यात येईल.
त्यामध्ये बाधीत शेतकऱ्याला त्वरित संपर्क करून मानसोपचार तज्ञाची मदत घेऊन समोपदेश करणे, स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणा असे ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य, तलाठीची मदत घेणे, जवळपासच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन प्रश्नांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करणे, मोफत न्यायालयीन मार्गदर्शन ह्यांचा अंतर्भाव असेल. ह्यात गोपनीयता पाळली जाईल परंतु संबंधित लोकांना माहीती दिली जाईल.


ह्या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील फक्त शेतकरी व शेतमजुर ह्यांनाच लाभ घेता येईल. इतर कारणे जसे शेक्षणीक अपयश, कुटुंब कलह, दुर्धर आजारपण वगेरै कारणांमुळे आलेल्या नैराश्यग्रस्तांचा ह्यात अंतर्भाव नाही.


*सध्या तरी प्रत्यक्ष आर्थिक मदतीची अपेक्षा कोणी करू नये कारण त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करायला वेळ लागेल.*


प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आमचे ध्येय आहे परंतु त्यात अपयश आल्यास संस्था चालक जबाबदार असणार नाहीत कारण हा विषय क्लिष्ट आहे.


संपर्क करण्यासाठी वाॕट्सॲप फोन क्रमांक (Lifeline Crisis Centre) व अधिक तपशील लवकरच कळविण्यात येईल. 


*अशा विधायक उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला संपर्क करावा.*


प्रवर्तकः


राहुल मस्के, B. E. (Mech), पुणे, डायरेक्टर, मान्सुन एॕग्रो बी. ओ. प्रा. लि. (93735 58393)


सतीश देशमुख, B. E. (Mech), पुणे (9881495518)  अध्यक्ष, "फोरम ऑफ़ इंटलेकच्युअल्स".