नागरिकांचे विविध कर्जांवरील व्याज माफ करावे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मा.ना.#उद्धवजी #ठाकरे #साहेब,
#मुख्यमंत्री,
#महाराष्ट्र #राज्य
#मुंबई..
द्वारा
मा #श्री.शेखर #सिंग (भा.प्र.से.)
#जिल्हाधिकारी, #सातारा.


विषय :


व्यापारी, उद्योजक यांच्या कर्जावरील व्याज माफ करणे बाबत.


 


मा.महोदय,छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष -करण गायकर व केंद्रीय अध्यक्ष- #प्रतापसिंह #शिवाजीराव #कांचन_पाटील यांच्या नेतृत्वाखाली,
मी सागर भारत साळुंखे-अध्यक्ष कराड तालुका.
छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने
आपणास या पत्राद्वारे विनंती करु इच्छितो की,
सरकारने जशी शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली आहे त्याच प्रकारे सरकारने लॉक डाऊन काळातील व्यापारी उद्योजक व इतर नागरिकांचे विविध कर्जांवरील व्याज माफ करावे. नुसते 3 महिने व्याज भरू नका म्हटले तरी नंतर तर ते द्यावे लागणारच की, यावर पुन्हा सरकार सांगते आहे की कामगारांना पगार द्या, हेही बरोबरच आहे की  त्यांचे घरतरी कसे चालणार, पण व्यावसायिकांना उत्पनच नसेल आणि विकलेल्या मालाची उधारीच येत नसेल तर व्यावसायिक  पैसे कोठून आणणार हेही  सरकारनेच सांगावे. 
यामध्ये मी एक केंद्र व राज्य सरकारला उपाय सुचवू इच्छितो की सरकारने जर व्यावसायिकांचे लॉक डाऊन काळातील व्याज माफ केले तर त्यांना कमीतकमी कामगारांचे पगार देता येतील व  स्वतःचे घर देखील चालवता येईल. अगदीच सरकारची व्यावसायिकांकडून करोना बधितांसाठी  मदतीची मागणी असेल तर माफ केलेल्या व्याजातील 10%  रक्कम करोना बाधित रुग्णानसाठी द्यावेत आणि ते थेट बँकेतूनच घेऊन तसे व्यावसायिकांना सर्टिफिकेट द्यावे व तेवढी रक्कम 80 G खाली घ्यावी. यामुळे व्यावसायिकांना देखील  करोना रुग्णांना मदत केल्याचे समाधान मिळेल.
याचबरोबर  सरकारने  हेही लक्षात घेतले पाहिजे की कर गोळा करून सरकारी नियमांप्रमाणे भरण्याचे महत्वाचे कामही व्यवसाईकच करतात. व्यावसायिक म्हणजे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रथाची दोन मजबूत चाके असतात आणि सरकारने त्यांना बळ देणे आवश्यक आहे असे वाटते. यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नम्र विनंती ...
आपला : 
#सागर #भारत #साळुंखे
#अध्यक्ष #कराड #तालुका
#छावा #क्रांतिवीर #सेना,
#महाराष्ट्र_राज्य.