पुणे विभागात मार्केटमध्ये  21 हजार 552 क्विंटल अन्नधान्यांची आवक--डॉ. दीपक म्हैसेकर*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पुणे विभागात मार्केटमध्ये  21 हजार 552 क्विंटल अन्नधान्यांची आवक--डॉ. दीपक म्हैसेकर*
95 लाख 17 हजार लीटर दुधाचे संकलन
पुणे, दि.3 : पुणे विभागात 3 एप्रिल 2020 रोजी मार्केटमध्ये एकूण 21 हजार 552 क्विंटल अन्नधान्याची आवक झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
   पुणे विभागात मार्केटमध्ये 6 हजार 854 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे.   9 हजार 544 क्विंटल फळांची आवक झाली तर 78 हजार 931 क्विंटल कांदा, बटाटयाची आवक झाली आहे. तसेच 95 लाख 17 हजार लीटर दुधाचे संकलन झाले आहे. 23 लाख 93 हजार लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरूपात वितरण करण्यात आले तर उर्वरित दूधाची सुटटया स्वरूपात विक्री करण्यात आली आहे. तसेच अन्नधान्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचण भासल्यास संबंधीत जिल्हयातील खालील अधिका-यांशी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
 पुणे जिल्हा श्री. भानुदास गायकवाड जिल्हा पुरवठा अधिकारी 020-26061013,श्रीमती अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी 020-26123743, सातारा जिल्हा श्रीमती स्नेहल किसवे जिल्हा पुरवठा अधिकारी 02162-234840,सांगली जिल्हा श्रीमती वसुंधरा बारवे जिल्हा पुरवठा अधिकारी 0233-2600512,कोल्हापूर जिल्हा   श्री. दत्तात्रय कवितके जिल्हा पुरवठा अधिकारी 0231-265579, सोलापूर जिल्हा श्री. उत्तम पाटील जिल्हा पुरवठा अधिकारी 0217-2731003 असे क्रमांक आहेत.
***