शाह कुटुंबियांकडून पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीस 2 लाख 22 हजार 222 रुपयांची मदत*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*शाह कुटुंबियांकडून पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीस 2 लाख 22 हजार 222 रुपयांची मदत*


  पुणे दि.27:- पुणे येथील नानचंद भोगीला शाह (वय-86 वर्षे), पत्नी सुमन नानचंद शाह (वय-79 वर्षे) यांच्या लग्नाच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त  त्यांच्या वतीने व मुलगा अजय नानचंद शाह, नातु रोहन संदीप कुमार शाह यांच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीसाठी 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश असे एकुण 2 लाख 22 हजार 222  रुपयांचे धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. 


दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणारा धार्मिक कार्यक्रम रद्द करुन देशहिताला महत्व देत श्री. शाह कुटुंबियांनी आर्थिक मदत देऊ केली. या संकल्पनेबाबत पुणे गोडीजी पार्श्वनाथ टेबल ट्रस्टचे चेअरमन अशोक पोपटलाल शाह व संपादक शैलश गुजर यांनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.  
00000000