पुणे प्रवाह न्युज पोर्टल
इंदिरा गांधी ......1970 चा भारतीय पेटेंट कायदा.....
हायड्रोक्सी क्लोरोक्वीन....... UPA सरकार ने पेटंट कायद्यातील केलेले बदल.... ... डोनाल्ड ट्रम्प... नरेंद्र मोदी.
ही साखळी समजून घेणे महत्वाचे आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जे काही महत्वाचे निर्णय घेतले त्यातील एक 1970 चा Indian Patent Act मंजूर करून घेणे.
या कायद्याने भारताने products patent ऐवजी process patent ला मान्यता दिली....... जगातील महासत्तांचा व बहुराष्ट्रीय कंपन्यांचा दबाव कणखरपणे झुगारत.
त्यामुळे भारतात भारतीय कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी तोडत मोठ्या प्रमाणात औषधांचे उत्पादन करू शकल्या. बाहेरच्या देशातून औषधे आयात करण्याचे थांबले.
देश औषधांबाबत स्वयंपूर्ण झाला आणि गेल्या अनेक वर्षांपासून भारत संपूर्ण जगाला औषधे निर्यात करतो... उच्च गुणवत्तेची व माफक किंमतीत.
आजही कोरोना च्या तडाख्यात सापडलेले देश मग ती अमेरिका असो वा स्पेन इटली सारखे युरोपियन देश असो अथवा ब्राझील असो यांना भारताकडुन Hydroxy Chloroquine हे औषध हवे आहे.
ह्याचा रास्त अभिमान आपण बाळगायला तर हवाच पण....... इतिहासाचे भान ठेवायला नको का?
Hydroxy Chloroquine चा भारतातील इतिहास आपण बघू.
Hydroxy Chloroquine हे औषध बनवणाऱ्या व निर्यात करणाऱ्या दोन भारतीय कंपन्यांची नावे आहेत IPCA आणि Cadila
IPCA company त्यांच्या वेबसाईटवर लिहते
"For more than 60 years Ipca has been partnering health care globally in over 120 countries"
या कंपनीची स्थापना आणि भरभराटीचा संबंध आहे 1970 च्या पेटंट कायद्याशी.
●1976 साली IPCA ने suger coated Chloroquine tablets चे मार्केटिंग सुरू केले भारतात पहिल्यांदा.....1970 चा पेटंट कायदा नसता तर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी याला परवानगीच दिली नसती.
● 1986 साली IPCA ने Chloroquine Phosphate या bulk drug ची निर्मिती करण्यासाठी पहिल्या API Plant ची सुरुवात रतलाम येथे केली. .....bulk drug निर्मिती हा औषधांच्या स्वयंपूर्णतेतील महत्वाचा टप्पा.
●1999 Hydroxy Chloroquine Sulphate चे formulation भारतात IPCA ने launch केले.
●2004 ला IPCAच्या रतलाम manufacturing facility ला US-FDA ची मान्यता मिळाली .....यामुळे विकसित देशांना औषधे निर्यात करण्याची परवानगी IPCA ला मिळाली.
डॉ मिलिंद वाघ