विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे नवीन कोरोना विषाणू   (कोविड-19) सद्य :स्थिती  व  उपाययोजना 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे
नवीन कोरोना विषाणू   (कोविड-19) सद्य :स्थिती  व  उपाययोजना
 दि. 11/04/2020 
 प्रेसनोट 
विभागातील  61  कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी.
आज विभागात  17  नवीन रुग्णांचे निदान.
      आज 1 कोरोना बाधीत रुग्णाचा  मृत्यू.
‍ विभागातील एकुण रुग्ण संख्या 300.
               ॲक्टीव रुग्ण संख्या 210.


           आज विभागात 17 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 300  झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण संख्या 210  आहे. प्राप्त अहवालानुसार 1 जण मृत असून तो  कराड , जि. सातारा येथील आहे. 
1) आज  दि. 11/04/2020 रोजी  KIIMS हॉस्पीटल, कराड येथे 62 वर्षीय कोरोनाबाधीत  रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास मधुमेह विकार होता.
अ. क्र. जिल्हा/मनपा बाधीत रुग्ण मृत्यू
1  पुणे / पिंपरी चिंचवड मनपा 251 26
2 पुणे ग्रामीण 12 1
3 कोल्हापूर 5 0
4 सातारा 6 2
5 सांगली 26 0
एकुण 300 29


           आजपर्यत  विभागामध्ये एकुण 4625 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 4311 चा अहवाल प्राप्त आहे. 311 नमून्यांचा अहवाल  प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 4011 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 300 चा अहवाल  पॉजिटिव्ह आहे.
           आजपर्यंत विभागामधील 25,06,156 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1,02,59,007 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 772  व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
 आज विभागीय आयुक्त यांनी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर्स व अधिकाऱ्यासमवेत  विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये कोवीड -19 च्या रुग्णांच्या उपचारांबाबत तसेच रुग्णालयातील आवश्यक सोई- सुवीधांबाबत चर्चा करण्यात येऊन महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
 आज विभागीय आयुक्त यांनी विभागातील अन्नधान्य पुरवठयाबाबत अन्नधान्य पुरवठा अधीकाऱ्यांची बैठक घेतली.  बैठकीत अन्नधान्य उपलब्धता व पुरवठयाबाबत आढावा घेण्यात येऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या.
 केंद्र सरकारच्या आरोग्य पथकासह विभागीय आयुक्त यांची महत्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये विभागातील कोवीड-19 च्या प्रादुर्भावाबाबतची सद्यस्थीती, प्रतीबंधात्मक उपाययोजना व आरोग्य सुवीधा इत्यादींबाबत सवीस्तर चर्चा झाली.
                            -------------------------