राज्य शासनाचया आवाहनानंतर आयोजित रक्तदान शिबिरात 155 रक्तदात्यांकडून रक्तदान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


राज्य शासनाचया आवाहनानंतर आयोजित रक्तदान शिबिरात 155 रक्तदात्यांकडून रक्तदान

कर्जत,ता.7 गणेश पवार

                  कोरोना वर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असून रुग्णांवर उपचार करताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असून रक्तदान घेण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी केले होते.त्यांनतर आयोजित केलेल्या नेरळ येथील रक्तदान शिबिरात तब्बल 155 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले.दरम्यान,नेरळ मधील एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे हे पहिले शिबिर ठरले आहे.

                    कर्जत अपडेट या सोशल मीडिया ग्रुप च्या माध्यमातून नेरळ येथील श्री समर्थ सेवा संघाच्या बापूराव धारप सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांचे हे 397 वे रक्तदान शिबिर होते आणि कल्याण तेथील संकल्प रक्तपेढी यांनी रक्त संक्रमण करण्याचे काम केले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे सभापती सुजाता मनवे,जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर,नेरळ चे सरपंच रावजी शिंगवा,उपसरपंच शंकर घोडविंदे,पंचायत समिती सदस्य नरेश मसणे,नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांचे हस्ते शिबिराचा शुभारंभ झाला.यांनी तर पहिले रक्तदान ग्रुप कार्यकर्ते मनोहर हजारे,बंडू क्षीरसागर यांनी केले.

                           कर्जत अपडेट ग्रुप चे सक्रिय कार्यकर्ते मिलिंद विरले,संदीप म्हसकर,बंडू क्षीरसागर,मनोहर हजारे,प्रवीण बाबरे,अनिल जैन,निलेश शाह,अमित जैन,प्रथेमश कर्णिक,ऍड अजित मंडलिक,योगेश साठे,शिवाजी कराळे,किशोर गायकवाड,गणेश पवार,दर्वेश पालकर,ऍड ऋषिकेश कांबळे,बाळा पादिर,अजय गायकवाड,कांता हाबळे, दीपक बोराडे, निलेश शाह,मंगेश इरमाळी,रवी मसणे,सनी चंचे,महेश मोरे,दिनेश कालेकर, किरण झोमटे,अनंता भोईर,गोरख शेप,कौशिक शाह, नरेंद कराळे,जयेश म्हसे,अमित देवळे आणि सहकारी यांनी केलेल्या प्रयत्न यामुळे शिबीर यशस्वी झाले आहे.सर्वांनी सहकार्याने हे शिबिरही आपण संचारबंदीचे व सोशल डिस्टेंसिनचे सर्व नियम पाळत सर्व रक्तदात्यांनी तासभर थांबून राहावे लागले,पण वेळ कमी असल्याने आणि वातावरणात असलेला उष्मा यामुळे अनेकांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यातील अनेक रक्तदाते यांना रक्तदान करता आले नाही. 

                     शिबिराला 300 पेक्षा जास्त रक्तदाते यांना सर्वांना रक्तदान करण्याची संधी मिळाली नाही.तर वेळ लागत असल्याने अनेक रक्तदाते देखील परत गेल्याने 200 चा आकडा पार पडला नाही.हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपल्या सर्व 

नेरळ ग्रामपंचायत,नेरळ पोलीस ठाणे,हुतात्मा स्मारक समिती,युवा मित्र मंडळ मोहाचीवाडी,नववर्ष स्वागत यात्रा,शिवराज प्रतिष्ठान,नेरळ व्यापारी फेडरेशन,रेल्वे प्रवासी संघटना,सिद्धिविनायक मित्र मंडळ,तसेच शेलू,पोशिर, तसेच परिसरातील गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले.  दिवसभरात पोलीस उपनिरीक्षक तात्या सावंजी,तसेच नेरळ शिवसेना शहर प्रमुख रोहिदास मोरे,भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर,राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष तहेसिन सहेद,माजी सरपंच आयुब तांबोळी,जान्हवी साळुंखे, बीआरएसपीचे सिद्धार्थ सदावर्ते, राजे प्रतिष्ठान चे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कराळे,कर्जत मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ जयश्री देशमुख, जेष्ठ डॉक्टर श्रीकांत डहाके,डॉ संदीप देशमुख,सकल मराठा क्रांती मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल भोसले,शिवसेना उपतालुका प्रमुख अंकुश दाभणे,विभाग प्रमुख प्रभाकर देशमुख,भाजप शहर अध्यक्ष अनिल जैन, शिवसेना उपशहर प्रमुख बंडू क्षीरसागर, ग्रामपंचायत प्रथमेश मोरे,धर्मानंद गायकवाड,अतुल चंचे, जयश्री मानकामे, शिवाली पोतदार,उमा खडे, गीतांजली देशमुख, आदींसह माजी उपसरपंच केतन पोतदार,माजी सदस्य जयवंत साळुंखे,नेरळ प्रवासी संघटना अध्यक्ष कमलेश ठक्कर,काँग्रेसचे अरविंद कटारिया,रेल्वे प्रवासी संघटनेचे संदीप बडेकर,राजेश गायकवाड, आबा पवार,भिवपुरी रेल्वे प्रवासी संघटनेचे किशोर गायकवाड,मनसे रेल्वे प्रवासी संघटनेचे उदय मोडक,निवृत्त पोलीस अधिकारी बाळकृष्ण साळवे,जेष्ठ नागरिक संघ उपाध्यक्ष सावळाराम जाधव,जेष्ठ कार्यकर्ते भगवान चव्हाण,जैन समाज विश्वस्त शंकेलश जैन आदी सह अनेक मान्यवर यांनी उपस्थित राहून शिबीर यशस्वी केले.