राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल च्या वतीने*      *पुण्यातील 15 हजार डॉक्टरना फेसशिल्ड

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट


*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल च्या वतीने*    
 *पुण्यातील 15 हजार डॉक्टरना फेसशिल्ड


पुणे:


कोरोना विषाणू विरूद्ध लढण्यात जोमाने पुढे असणारया डॉक्टर समुदायाला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे वतीने पुण्यातील १५ हजार डॉक्टरना फेसशिल्ड देण्यात येणार आहे.हा अनौपचारिक कार्यक्रम रविवारी 26 एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता साई स्नेह हॉस्पिटल(कात्रज) येथे होणार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलचे पुणे शहराध्यक्ष डॉ.सुनील जगताप यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली  धुमाळ तसेच राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.


पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार,खा.सुप्रिया सुळे,डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे राज्यात  दीड लाख फेसशिल्डचे वितरण आरोग्य व्यवस्थामधील डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना केले जात आहे.
'कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये वैद्यकीय सेवा ही आपली युद्धभूमी समजून धैर्याने सेवा देत आहेत अशा सर्व डॉक्टरांना फेस शिल्ड देण्यात येत आहे.पुण्यात १६ वैद्यकीय संघटनामार्फत फेसशिल्ड चे वितरण करण्यात येणार आहे,' असे डॉ.सुनील जगताप यांनी सांगितले.   
       ------------------------