पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पाठपुरावा... 'ससुन हाॕस्पिटल...'
*ससून रुग्णालयातील 11 मजली (बहुमजली) इमारत सर्वांसाठी खुली करावी...* म्हणून आम्ही (दि. 4 एप्रिल 2018) रोजी संभाजी ब्रिगेड ने तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे लेखी तक्रार देऊन राज्य सरकारलाही पत्रव्यवहार केला होता. मात्र यावर सरकारने कुठलेही गांभीर्याने पाऊल उचलले नाही. *'नायडू हॉस्पिटल'* कोरोना रुग्णाने 'हाऊसफूल्ल' झाले. *काही दिवसात #कोरोनाचे रुग्ण रस्त्यावर उपचार घेतील आणि रस्त्यावर मरतील अशी परिस्थिती निर्माण होईल.*
आरोग्य विभाग, महाराष्ट्र, मा. जिल्हाधिकारी, ससून रुग्णालय व राज्य सरकारने 11 मजली इमारत तत्काळ ताब्यात घेऊन कोरोना रुग्णांसाठी तिचा वापर करावा...
- संतोष शिंदे,
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.
*जुना संदर्भ - (दि. 4 एप्रिल 2018)*
'ससून' रूग्णालयातील ११ मजली (बहूमजली) इमारतीचे दोन वर्षापासून रखडलेले काम त्वरीत पुर्ण करा... - संभाजी ब्रिगेड
ससून सर्वोपचार रूग्णालयातील ११ मजली नवीन इमारतीचे काम #दोन_वर्षापासून खडलेले आहे. राज्य सरकारने १२० कोटी रूपये मंजूर करून मागील दोन वर्षापासून काम बंद आहे. सन २०१६-१७ मध्ये 62 कोटी तर २०१७-१८ मध्ये १६ कोटी रूपये बजेट आले पण खर्च झाले नाही . स्थापत्य कामाची गरज असताना... अंतर्गत खोडसाळपणामुळे विद्युतचे काम सुरू केले. सदर कामावर आजपर्यंत 70 कोटी रूपयांचे आतील Civil work व 20 कोटी रूपयांचे Elitrical Work या कामावर पैसे खर्च झालेले आहेत. परंतु काम बंद असल्यामुळे झालेल्या कामाची पडझड सुरू आहे. तरीही याकडे कोणतेही ही गांर्भियाने घेत नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग दोन वर्षात निविदा प्रक्रिया पुर्ण करू शकलेला नाही. म्हणून सरकार कडून उपलब्ध अनुदान मिळून सुध्दा अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे व निविदा प्रक्रिये अभावी काम रखडलेले आहे. यामुळे सामान्य गरीब नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रूग्णांना वार्डमध्ये जागा कमी पडत असल्यामुळे नागरिकांना (रूग्णांना) खाली जमिनीवर टाकले जाते... आणि अर्धवट बहूमजली इमारत पडून आहे.
'११ माजली इमारत सामान्य रूग्णाला महत्त्वाची असून पिडीत व वंचितांना त्याचा फायदा झाला पाहिजे... म्हणून ११ मजली इमारतीचे संपुर्ण काम त्वरीत पुर्ण करा... यासाठी आज ससून अधिष्ठाता डाॕ. अजय चंदनवाले व सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता मा. किडे यांना निवेदनाव्दारे तक्रार केली आहे.
११ मजली (बहुमजली इमारत) दोन वर्षापासून अर्थवट कामामुळे पडून आहे... राज्यसरकारचे ११० कोटी रूपये पाण्यात... दोषींवर कारवाई करा...! याबाबत आम्ही मा. #राज्यपाल व मा. #मुख्यमंत्री यांच्याकडे ही पाठपुरावा करणार आहोत...
- संतोष शिंदे,
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.
वरील बातमीचा गांभीर्याने विचार करून. बातमी प्रसिद्ध करावी...