पुणे विभागात कोरोना बाधित 1हजार 31 रुग्ण*                  *विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पुणे विभागात कोरोना बाधित 1हजार 31 रुग्ण*
                 *विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर*


  * विभागात 172 कोरोना बाधित रुग्ण बरे


  * विभागामधील 47 लाख 51 हजार 802 घरांचे सर्वेक्षण पूर्ण


   * 1 कोटी 82 लाख 71 हजार 857 व्यक्तींची तपासणी
     
    पुणे दि.23:- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 31 झाली असून विभागात 172 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 794 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 13 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  विभागात 1 हजार 31 बाधित रुग्ण असून 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 936 बाधीत रुग्ण असून 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 21 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 37 बाधीत रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत. 
  आजपर्यत विभागामध्ये एकुण  11 हजार 707 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 11 हजार 46 चा अहवाल प्राप्त झाल असून  662 नमून्यांचा अहवाल  प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  9 हजार 964 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 31 चा अहवाल  पॉझिटिव्ह आहे.
  आजपर्यंत विभागामधील 47 लाख 51 हजार 802 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 82 लाख 71 हजार 857 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 927 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे. 
                     000 0000


Popular posts
शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"  शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .
Image
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
ज्ञानदाइन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी द्वारे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
२७ फेंबुवारी मराठी भाषा दिन* जाणतो मराठी .......मानतो मराठी ; जागतिक मराठी दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image