मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात, कर्मचाऱ्यांनाही ५० ते ६० टक्केच वेतन  ___________________________________

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


  मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात, कर्मचाऱ्यांनाही ५० ते ६० टक्केच वेतन 
___________________________________


देशात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. तसेच, देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. देशात आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी काही राज्यांनी आपल्या बजेटमध्ये बदल केले आहे. त्यानुसार सरकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. तेलंगणानंतर आता आंध्र प्रदेशातील राज्य सरकारने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. 


आंध्र प्रदेश सरकारच्या निर्यणानुसार मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि सर्व आमदारांच्या वेतनात १०० टक्क्यांची कपात केली जाणार आहे. ही कपात राज्यात आलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी करण्यात आली आहे. याशिवाय, राज्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या (IAS-IPS-IFS) वेतनात ६० टक्के कपात करण्यात येणार आहे. इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ५० टक्के आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के कपात केली जाणार आहे.


कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देशातील इतर राज्यांनी अनेक योजना आखल्या आहेत. तसेच, आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयानुसार लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारनेही आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात केली आहे. तर महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.


आंध्र प्रदेशात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. आंध्र प्रदेशात ४० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.