होम क्वारंटाईनचा शिक्का असताना उमरगाहून मुंबईकडे निघालेले १६ जण ताब्यात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


होम क्वारंटाईनचा शिक्का असताना उमरगाहून मुंबईकडे निघालेले १६ जण ताब्यात
__________________________________


होम क्वारंटाईनचा शिक्का असताना उमरगा येथून मुंबई येथे वाहनाने जाणाऱ्या १६ जणांना वडगाव पोलिसांनी  पकडले.  यामध्ये तीन पुरूष, चार महिला व अल्पवयीन असलेली नऊ मुले असे एकूण सोळा प्रवाशांचा समावेश होता. त्यांची तपासणी केली असता सर्वांच्या हातावर होमक्वारंटाईनचे शिक्के होते. त्यांना वडगाव येथील भेगडे लॉन्समध्ये पोलिस बंदोबस्तात होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु,कर्नाटक सीमेवर असलेल्या मुरूमगाव येथून सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास या सोळा जणांनी नाकाबंदी असताना कसा केला हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 
मैनुद्दीन शरमुद्दीन शेख वय २९ रा.गौतमनगर, अंधेरी )असे गुन्हा दाखल केलेल्या चालकाचे नाव आहे 
पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे वडगाव तळेगाव फाट्यावर नाकाबंदी करण्यात आली.तपासणी करताना कार  (एमएच ०२ सीआर ८८१०) यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसलेले आढळले. यामध्ये तीन पुरूष, चार महिला व अल्पवयीन असलेली नऊ मुले असे एकूण सोळा प्रवाशांचा समावेश होता. यांची तपासणी केली असतात सर्वांच्या हातावर होमक्वारंटाईन शिक्के होते. हे सर्वजन २२ मार्च पासून मुरूमगाव येथे वास्तव्यास होते.त्यांची तेथील शासकीय रूग्णालयात तपासणी करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांची तळेगाव येथील जनरल हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय करून त्यांना वडगाव येथे ठेवण्यात आले. होम क्वारंटाईन असल्याने त्यांनी तिथेच राहणे आवश्यक असताना ते मुंबईला चालले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image