उरुळी कचरा डेपो,कचरा निर्मूलनाचा प्रश्न नजीकच्या काळात कायमस्वरूपी मिटविला जाईल, मा,मुरलीधर मोहोळ,महापौर,पुणे,

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


कृपया प्रसिद्धीकरिता,
उरुळी कचरा डेपो,कचरा निर्मूलनाचा प्रश्न नजीकच्या काळात कायमस्वरूपी मिटविला जाईल,
मा,मुरलीधर मोहोळ,महापौर,पुणे,
फुरसुंगी येथील उरुळी कचरा डेपो संदर्भातील कचरा निर्मूलनाचा प्रश्न नजीकच्या काळात कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करून निकालात काढला जाईल,याकरिता कचरा प्रक्रिया निर्मूलनाकरणेकरिता शहराच्या विविध भागात कार्यरत असलेल्या कचरा निर्मूलन प्रक्रिया ठेकेदार कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी,मनपा प्रशासन, यांची संयुक्त बैठक मा,महापौर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली,याप्रसंगी मा,महापौर यांनी संबधीत प्रतिनिधी यांचेशी सविस्तर चर्चा केली,
फुरसुंगी येथील उरुळी कचरा डेपोतील कचरा प्रक्रिया निर्मूलनाबाबत उपस्थित प्रतिनिधींना त्यांनी सांगितले कि सद्धयस्थिती मधील आढावा घेतल्यावर त्यांनी सांगितले सुरू असलेले प्रकल्प अधिक वाढ,अथवा क्षमतावाढ करणे,तांत्रिकदृष्ट्या अडचणी दूर करणे,प्रशासनाकडून आवश्यक मदत घेणे व जलदगतीने समस्या सोडविणे,त्यानुसार प्रभावी नियोजन करून नजीकच्या काळात कचरा निर्मूलनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याकरिता एकत्रितपणे यशस्वी प्रयत्न करणे आवश्यक असून याच कारणास्तव बैठकीचे आयोजन केल्याचे मा,महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले,
बैठकीस मा,अतिरिक्त महापालिका आयुक्त ( विशेष ) शान्तनू गोयल,घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोलक,व अन्य अधिकारी उपस्थित होते,
मा,शान्तनू गोयल यांनी उपस्थित प्रतिनिधी समवेत चर्चा करताना सांगितले की,प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालण्याकरिता सद्धयस्थिती मधील अडचणी,प्रकल्पात वाढ करणे,तांत्रिक अडचणी,विविध प्रकारच्या अडचणी,यासंदर्भात चर्चा करणे,मान्यतेसाठी जलदगतीने कार्यवाही करणेकरिता सर्वांनी प्रभावी नियोजन करून अंमलबजावणी करावी असे सांगितले,
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोलक यांनी प्रास्ताविक स्वरूपात सद्धयस्थिती बाबत सविस्तर माहिती दिली,तसेच पुढील काळात जलद रित्या करावयाचे नियोजनाबाबत माहिती दिली,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महापालिका,
०२/०३/२०२०,


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*