सामाजिक क्रांति आणण्यासाठी*  *क्रांतिकारी फकिरासारखे युवक घडविणे*  *काळाची गरज - प्रदिप बोरकर*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*सामाजिक क्रांति आणण्यासाठी*
 *क्रांतिकारी फकिरासारखे युवक घडविणे*
 *काळाची गरज - प्रदिप बोरकर*


नागपूर: क्रांतिकारी फकिरा यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला, भीषण दुष्काळग्रस्त परिस्थितीत भुकेने व्याकूळलेल्या गोरगरीबांना जगविण्यासाठी जुलूमी इंग्रजांवर तुटून पडले, इंग्रजांचे खजिने लुटून गोरगरीबांना वाटले, अशा महान क्रांतिकारी फकिराला तत्कालिन इतिहासकारांनी नायकऐवजी खलनायक म्हणून संबोधिले, परंतू मराठी साहित्यकलेचे जगविख्यात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी क्रांतिकारी फकिरा यांना आपल्या फकिरा कादंबरीत अत्यंत सुंदर, मार्मिक, विद्रोही  आणि क्रांतिकारी शब्दात लेखनबद्ध केले आणि ही फकिरा कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची सर्वश्रेष्ठ कादंबरी म्हणून जगप्रसिद्ध झाली. अण्णाभाऊ साठे यांनी आपली हीच सर्वश्रेष्ठ कादंबरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखनीला व महान कार्याला १ मार्च १९५९ रोजी अर्पण केली होती तोच ऐतिहासिक आणि अविस्मरणीय दिवस म्हणजे फकिरा कादंबरी अर्पण दिन होय, असे सांगत मातंग समाजात पुन्हा सामाजिकक्रांति आणण्यासाठी फकिरासारखे
क्रांतिकारी लढवय्ये युवक घडविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त प्रदिप बोरकर यांनी केले.
ते आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक ट्रस्टच्या वतीने फकिरा कादंबरी अर्पण दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे स्मारक परिसर, दिक्षाभूमी नागपूर येथे आयोजित अभिवादन कार्यक्रम व समाज चिंतन बैठकीत प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.


यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


अभिवादन कार्यक्रम व समाज चिंतन बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष शरद जाधव, प्रमुख पाहूणे म्हणून सहाय्यक आयुक्त प्रदिप बोरकर, ट्रस्टचे संस्थापक राजेश खंडारे, उपाध्यक्ष विनायक इंगोले, ज्येष्ठ समाजसेवक अशोक भावे, महाराष्ट्र मातंग एकीकरण समितीचे निमंत्रक कॉ. बुधाजी सुरकार, लहूसेनाध्यक्ष संजय कठाळे, समाजसेवक किशोर बेहाडे, समाजसेविका उषाताई अडागळे, ज्येष्ठनेते प्रभुदास तायवाडे, ज्येष्ठ समाजसेवक शंकरराव वानखेडे, गुरूदास बावणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनोद लोखंडे, रमेश बावणे, भारत डोंगरे, प्रामुख्याने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवशंकर ताकतोडे, सागर जाधव, पद्माकर बावणे, वैभव इंगोले, सुधाकर बोरकर, हर्ष इंगोले, मेघदत्त गायकवाड,  संजय ठोसर, हर्ष इंगोले, चंदू खडसे इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*