कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कत्तलखाने, उदघड्यावरील मांसविक्रीवर बंदी घालण्याची डॉ. कल्याण गंगवाल यांची मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे मागणी*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कत्तलखाने, उदघड्यावरील मांसविक्रीवर बंदी घालण्याची डॉ. कल्याण गंगवाल यांची मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे मागणी*


पुणे : अवैध कत्तलखाने, उघड्यावरील मांस विक्री यामुळे अस्वच्छता पसरली जाते. कोरोनासारख्या साथीच्या रोगावर नियंत्रण आणायचे, तर स्वच्छता आणि काळजी घेणे या गोष्टी महत्वाच्या आहेत. मात्र, राज्यभरात विविध ठिकाणी मांस विक्रीची दुकाने अजूनही सुरु आहेत. यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तरी शहरातील सर्व बेकायदा कत्तलखाने आणि उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करत त्यांची दुकाने बंद करावीत, अशी मागणी पुण्यातील सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शाकाहार कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून डॉ. गंगवाल यांनी शासनाकडे ही मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अजूनही वाढत असून, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा तीनशेच्या घरात पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अस्वच्छता आणि बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने होतो. उघड्यावर मांसविक्री करणे बेकायदेशीर आहे. तसेच मांस घेण्यासाठी नागरिक या विक्री केंद्रांवर गर्दी करतात. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अवैध कत्तलखाने आणि मांसविक्रीवर बंदी घालण्यात यावी."


"कर्नाटक आणि मध्यप्रदेशातही अवैध कत्तलखाने आणि मांसविक्रीवर शासन आदेश काढून बंदी घालण्यात आली आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र शासनानेही राज्यातील अवैध कत्तलखाने आणि उघड्यावरील मांस विक्रीवर त्वरित बंदी घालावी. संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबविल्या जात आहेत, परंतु या मांसविक्री केंद्रातून अस्वच्छता पसरत राहिली आणि येथे गर्दी होत राहिली, तर कोरोना विषाणू पसरत राहील."


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com


मेलवर पाठविणे बंधनकारक*