पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कोंढाणे धरण शासनाने बांधावे- माजी आमदार सुरेश लाड यांची मागणी... नंतर पाणी कोणालाही विकावे
कर्जत,ता.13 बातमीदार
कर्जत तालुक्यातील नियोजित कोंढाणे धरण हे शासनाने बांधावे आणि त्यातील पाणी शासनाने कोणालाही विकावे अशी मागणी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण सिडको विकण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला असून तो निर्णय घेतल्यापासून त्यावेळी आमदार असलेले सुरेश लाड हे आपल्या मागणी वर ठाम होते.
कर्जत तालुक्यातील उल्हासनदीवर कोंढाणे धरण बांधण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने 2011 मध्ये जाहीर केले होते. त्यानंतर राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने धरणाचे काम देखील सुरु केले होते आणि 2012 मध्ये राज्यात सिंचन घोटाळा झाला आणि कर्जत तालुक्यातील या धरणाचे काम शासनाने बंद केले होते. ते काम सलग सहा वर्षे बंद ठेवल्यास ते काम कोणत्या घोटाळ्यामुळे बंद ठेवण्यात आले होते,याची कोणतीही माहिती शासनाने जाहीर न करता राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने ते धरण नवी मुंबई मधील सिडको महामंडळ यांना विकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आमदार असलेले सुरेश लाड यांनी धरण हे कर्जत तालुक्यस्तही व्हावे अशी अनेक वर्षांपासून ची मागणी होती आणि त्या मागणीमुळे धरण शासनाने कर्जत तालुकयातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी बांधावे अशी मागणी रेटून धरली होती. पण धरण भाजप सरकारने सिडको ला देताना कोणत्याही प्रकारची जनसुनावणी घेतली नाही आणि तसेच धरण देण्याचा निर्णय घेतला.
मात्र कोंढाणे धरण देण्याचा निर्णय झाल्यापासून कोंढाणे धरण परिसरातील लोकांनी मोठा संघर्ष आजही सुरु ठेवला आहे.अनेकवेळा स्थानिक शेतकरी आणि कोंढाणे धरण संघर्ष समितीचे कार्यकर्ते यांनी धरणाच्या परिसरात मोजणी करण्यस्तही येणारे सिडको चे अधिकारी यांना पिटाळून लावले आहे. त्यात आता महाराष्ट्र विकास आघाडीच्या राज्य सरकारकडे दाद मागण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला असून कोंढाणे धरण हे कोणत्याही संस्थेला न देता ते राज्य शासनाने बांधावे अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने निमंत्रक माजी आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. २०११ मध्ये शासनाचं जलसंपदा विभागाने धरणाचे काम सुरु केल्यानंतर ज्याप्रमाणे उल्हासनदीचे पाणी उचलणाऱ्या बदलापूर पासून मीरा भाईंदर शहरांनी आणि त्या भागातील औद्योगिक वसाहती यांनी पाण्याची मागणी शासनाकडे केली होती/ त्याप्रमाणे धरण शासनानेच बांधावे आणि धरणात अडविले पाणी हे उल्हास नदीमध्ये सोडून द्यावे अशी मागणी कर्जत मधील कोंढाणे धरण संघर्ष समिती करीत आहे.
याबाबत संघर्ष समितीचे निमंत्रक माजी आमदार सुरेश लाड यांनी आपल्या शेजारी असलेले चौक येथील मोरबे धरण हे शासनाने नवी मुंबई महानगरपालिका यांना विकले आहे.चौक येथील नदीमध्ये पाण्याचा एक टिपूस देखील नवी मुंबई महानगरपालिका सोडत नाही. त्यामुळे चौक आणि परिसरातुन वाहणारी नदी गवताने भरून गेली असून मोरबे हे मध्यम धरण भरायला सप्टेंबर महिना लागतो आणि त्यामुळे चौक येथील नदीत पाण्याचा थेम्ब जात नाही. अशी स्थिती कोंढाणे धरण शासनाने सिडको महामंडळ यांना दिल्यास उल्हास नदीमध्ये पाणी सोडले न गेल्यास कर्जत तालुक्यातील अर्ध्याहून अधिक भागात पाण्याची टंचाई भासत आहे. त्याचवेळी कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गृह प्रक्लप साकारत असून त्यांना कोंढाणे धरणाचे पाणी नवी मुंबईत नेल्यास त्यांना कुठे पाणी मिळणार?हा प्रश्न घेऊन माजी आमदार सुरेश लाड यांनी हे धरणं राज्य शासनाने बांधावे अशी मागणी केली आहे. ती मागणीचे निवेदन कोंढाणे धरण संघर्ष समिती राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यंमत्री यांना देणार आहे.