मावळ्यांनी... रक्ताने रक्ताला दिली मानवंदना...'* आज... (११ मार्च) छत्रपती संभाजी महाराज स्मृती दिन...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*' मावळ्यांनी... रक्ताने रक्ताला दिली मानवंदना...'*


आज... (११ मार्च)
छत्रपती संभाजी महाराज स्मृती दिन...


*छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास शंभूराजांनी इतिहास रक्ताने लिहिला शंभुराजेंचे कार्य, कर्तृत्व, शौर्य आणि पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी शेकडो मावळ्यांनी रक्तदान करून मानवंदना दिली.*


'राजे... तुमच्या सांडलेल्या रक्ताची शपथ, इथून पुढचं आयुष्य शिवकार्यासाठी घालवेल. तुमच्या विचारांचा कार्याचा आणि शिवचरित्राचा सदैव प्रचार-प्रसार करेल. या सह्याद्रीची तुमच्या शौर्याने स्पर्श झालेली माती कपाळी लावून आयुष्यभर शिव विचारांचा जागर करेल. संभाजी महाराज, तुमचा स्मृतिदिन... तुमचे सांडलेले रक्त, हाच माझ्या आयुष्याचा संघर्षात्मक वसा आणि वारसा असेल. शिवरायांचे संस्कार व शंभूराजे तुमचे विचार सदैव जिवंत ठेवीन.'


*साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज यांनी  बुद्धभूषण नखशिख सातसतक व नाइकाभेद हे चार ग्रंथ लिहिले ते फक्त दुसरे छत्रपती नव्हते तर सर्वगुणसंपन्न राजा सुद्धा होते छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रांतीची धगधगती ज्योत सतत पेटवण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना मानवंदना देण्यासाठी आपण आज संभाजी महाराज स्मृती दिनानिमित्त 'रक्तदान' रक्तदान शिबिर घेण्यात आले.*


*मंत्रालयात छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा असली पाहिजे. या साठी आता संभाजी ब्रिगेड पाठपुरवा करणारा आहे आणि या बाबत मुख्मंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच ब्रिगेडचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती दिना निमित्त महाराष्ट्रभर दरवर्षी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून प्रत्येक रक्तदात्या'ला 'बुधभूषण' हा ग्रंथ देण्यात आला*


छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अभिवादन करताना अखील शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, तालुकाध्यक्ष गणेश चऱ्हाटे, जिल्हा सचिव महादेव मातेरे, वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंदार बहिरट, शहराध्यक्ष राहुल टेंगळे, विनायक घुले, चित्रपट आघाडीचे अध्यक्ष प्रकाश धिंडले, पुरंदर तालुका अध्यक्ष सागर पोमन, मयूर शिरोळे, सचिन जोशी, महेश पवार, प्रसिद्ध वक्ते राजेंद्र पाटील, ज्योतिबा नरवडे, उत्तम कामठे, महेश टिळे, अनिकेत मोरे, मनोहर गोरे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.


रक्तदान शिबिराचे आयोजन संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन यांनी केले होते.


प्रशांत धुमाळ - ९८८१४०२२४१
संतोष शिंदे    - ९८५०८४२७०३
मंदार बहिरट  - ९३७३३२०५२५


संभाजी ब्रिगेड, पुणे.