कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे डब्याचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे डब्याचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये**पंजाब:-* कोरोना संक्रमित आणि संशयितांची वाढती संख्या पाहता देशात रुग्णालये कमी पडण्याची शक्यता आहे. यावर भारतीय रेल्वेने उपाय शोधला असून रेल्वे डब्याचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये केलं आहे.
कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वेगाने वाढत आहे. सोबतचं कोरोना संशयितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी सरकारी आणि खासगी रुग्णालये कमी पडत आहे. शिवाय कोरोना संशयित रुग्णांना घरातचं कॉरंटाईन करणे धोक्याचं आहे. यावर भारतीय रेल्वेने उपाय शोधला आहे. बंद पडलेल्या रेल्वेच्या डब्याचे रुपांतर त्यांनी रुग्णालयात केलं आहे. डब्यात आयसोलेश वार्डची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णालयांची कमतरता भासल्यास रेल्वेचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने आता रेल्वेच्या डब्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतरीत केलं आहे. पश्चिम रेल्वेकडून वर्कशॉपमध्ये 28 डब्यांत प्रायोगिक स्वरुपातील आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. गरज पडल्यास असे 3 लाख आयसोलेशन बेड होऊ शकतात. रेल्वेच्या 28 नॉन एसी कोचचे रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये केलं आहे. वर्कशॉपमध्ये पाच आणि एएमव्हीमध्ये 5 कोच आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. दोन्ही वर्कशॉप्स प्रोटोटाइप कोच फायनल स्टेजमध्ये आहेत. 28 कोच 6 एप्रिलपर्यंत तयार करण्यात येतील.
कसं आहे आयसोलेशन वॉर्ड?
प्रत्येक कोचमध्ये शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा काढण्यात आला आहे. तसंच प्रत्येक कोचच्या शेवटी एक इंडियन स्टाइल टॉयलेटचं रुपांतर बाथरूममध्ये कऱण्यात आलं आहे. टॉयलेटमध्ये बादली, मग आणि सोप डिश ठेवली आहे. तसंच मधले बर्थही काढण्यात आले आहेत. रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार कोचमध्ये अप्पर बर्थवर चढण्यासाठी असलेल्या शिड्या काढल्या आहेत. तसंच प्रत्येक केबिनमध्ये मेडिकल इक्विपमेंटसाठी बॉटल होल्डर लावण्यात आले आहेत. डब्यांमध्ये चार्जिंग स्लॉटही दुरुस्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय प्रत्येक केबिनमध्ये प्लास्टिकचे पडदे लावण्यात आले आहे
देशात कोरोना संक्रमितांची संख्या हजारच्या जवळ
देशात कोरोना संक्रमितांची संख्या वेगाने वाढत आहे. आत्ताच्या घडीला 953 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात सर्वाधिक 176 रुग्ण हे केरळमध्ये असून त्या खालोखाल महाराष्ट्रात 167 रुग्ण आहेत. केंद्र सरकारने कोरोना संकटांशी लढण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. तर, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली. अन्नसुरक्षा आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला थेट पैसे देण्याची योजना केंद्र सरकारने घोषित केली.