महाराष्ट्रातील या १० लॅबलाच मिळालीये कोरोना टेस्टची परवानगी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


महाराष्ट्रातील या १० लॅबलाच मिळालीये कोरोना टेस्टची परवानगी
___________________________________


चीनच्या वुहान शहरापासून थैमान घालत निघालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगातील अनेक मातब्बरदेश या घातक व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देश एक झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन काउंसील ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोना तपासणीसाठी देशातील काही प्रायव्हेट लॅबला मंजुरी दिली आहे. 
कोरोनाच्या तपासणीसाठी संपूर्ण देशभरात १५५०० कलेक्शन सेंटर तयार झाले आहेत. एवढेच नाही, तर आयसीएमआरने कोरोना तपासणीसाठी निश्चित केलेली फीस ही जगातील कोरोना तपासणीची सर्वात कमी फीस आहे.


आयसीएमआरने निश्चित केल्यानुसार, खासगी लॅबला कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी ४५०० रुपयांहून अधिक किंमत घेता येणार नाही. या तपासणीत स्क्रीनिंगसाठी १५०० रुपये आणि  कंफर्मेशन टेस्टसाठी ३००० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय सरकारी लॅबमध्ये कोरोनाची पहिली आणि दुसरी तपासणी मोफत केली जाणार आहे.


अशा आहे सरकारी आणि खासगी लॅबची यादी -


मराहाष्ट्र - 
खासगी लॅब - 


०१) InfeXn लॅबोरेटरी, ए/131, थेरलेस कम्पाउंड, रोड नंबर 23, वागळे इंडस्ट्रियल स्टेट, ठाणे (पश्चिम).


०२) थायरोकेयर टेक्नॉलॉजीस लिमिटेड, डी 37/1, टीटीसी एमआयडीसी, नवी मुंबई.


०३) सर एचएन रिलायंस फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मॉलिक्युलर मेडिसायंस, रिलायंस लाइफ सायंसेस, आर-282, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, राबेल, नवी मुंबई.


०४) सबरबन डायग्नोस्टिक, 306-307, तिसरा मजला, कॉमर्शियल बिल्डिंग-1, कोहिनूर मॉल, मुंबई.


०५) एजी डायग्नोस्टिक, नयनतारा बिल्डिंग, पुणे.


०६) एसआरएल लिमिटेड, प्राइम स्क्वैअर बिल्डिंग, प्लॉट नंबर 1, गायवाड़ी इंडस्ट्रियल स्टेट, एसव्ही रोड, गोरेगाव, मुंबई.


०७ ) कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबोरेटरी, फोर बंगलो, मुंबई.


०८ ) आय-जेनेटिक डायग्नोस्टिक, क्रिस्लन हाऊस, अंधेरी ईस्ट, मुंबई.


सरकारी लॅब -


०९) संक्रमक आजारांसाठी कस्तुरबा रुग्णालय - मुंबई.


१०) इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज- नागपूर.


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image