चित्रपदार्पण पुरस्कारांची नामांकने जाहीर*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*चित्रपदार्पण पुरस्कारांची नामांकने जाहीर*


पुणे : नवोदितांच्या प्रोत्साहनासाठी मार्व्हल इव्हेंट्स अ‍ॅन्ड फिल्म प्रॉडक्शन आणि मराठी चित्रपट परिवारातर्फे आयोजित दहाव्या चित्रपदार्पण पुरस्काराची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. आटपाडी नाईट्स, एक निर्णय आणि ६६ सदाशिव या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे नामांकन मिळाले आहे. योगेश देशपांडे (६६ सदाशिव), नितीन सुपेकर (आटपाडी नाईट्स), राज गुप्ता (बाबा), संकेत पावसे (ट्रिपल सीट), श्रीरंग देशमुख (एक निर्णय), मंगेश कंठाळे (सूरसपाटा), श्रेयस जाधव (मी पण सचिन) आणि नरेश बिडकर (वन्स मोअर) यांच्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी स्पर्धा आहे. किर्ती रायकर, सुनंदा काळुसकर, विनायक पाष्टे यांच्यातर्फे या पुरस्कार सोहळ्याचे संयोजन करण्यात येणार आहे.


दिपक डोब्रियाल (बाबा), योगेश देशपांडे (६६ सदाशिव) आणि आशुतोष पत्की (वन्स मोअर) यांच्यामधून सर्वोत्कृष्ट अभिनेता निवडण्यात येणार आहे. हेमल इंगळे (अशी हि आशिकी),  कुंजिका काळविंट (एक निर्णय), सायली संजीव (आटपाडी नाईट्स), धनश्री दळवी (वन्स मोअर), अपूर्वा मोडक (६६ सदाशिव), अंकिता लांडे (गर्ल्स) यांच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी चुरस आहे. संगीत अल्बम विभागामध्ये पैंजणे, खिडकी दारे उघडा, दूर चांदण्यांच्या गावा, चाहुल ही, घननीळ तुझ्या डोळयांच्या, आठवांच्या मैफिलीला, ओंझळीत उरले आणि सोनचाफा यांना सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम विभागासाठी नामांकने मिळाली आहेत.