पुणे प्रवाह न्युज पोर्टल
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रामुख्याने कुस्ती, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल या चार स्पर्धा घेतल्या जातात. येणाऱ्या १८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या नियोजन बैठकीच्या निमित्ताने राज्य क्रीडामंत्री अदितीताई तटकरे पिंपरी चिंचवड शहरात आल्या असता यांच्याशी भेट झाली. या प्रसंगी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, पुणे मनपाचे नगरसेवक बाबुराव चांदेरे, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन चे पदाधिकारी, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी संतान साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने शासन स्तरावरील क्रीडा संबधीत काही गोष्टी समजल्या.
१. वरील चार स्पर्धांपैकी कुस्ती स्पर्धा मागील शासनाने गेली चार पाच वर्ष घेतल्या नाहीत.
२. यंदा ही कुस्ती स्पर्धा सांगली येथे होत आहे.
३. वरील स्पर्धांसाठी राज्य शासनाच्या वतीने ५० लाख रुपयांची मदत केली जाते. ह्या स्पर्धा अजून आकर्षक व्हाव्यात म्हणून अदितीताई तटकरे यांच्या मागणीनुसार मा. अजितदादा पवार यांनी वित्तमंत्री या नात्याने ही मदत वाढवून ७५ लाख केली आहे.
४. यंदाच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद मा. अजितदादांनी केली.
५. बालेवाडी स्टेडियम येथे क्रीडा विद्यापीठ ( स्पोर्ट युनिव्हर्सिटी) ला मान्यता देण्यात अली आहे.
६. सदर स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूला शासन दरबारी नोकरी मिळण्याची तरतूद राष्ट्रवादी काँगेस आघाडी सरकारच्या काळात करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून दरम्यानच्या काळात घेतल्या गेलेल्या महापौरचषक व इतर स्पर्धांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे आरोप माध्यमे आणि विरोधीपक्षांनी केले होते. याची देखील सखोल चौकशी करणार असल्याचे राज्यक्रीडा मंत्र्यांनी जाहीर केले.एकंदरीतच क्रीडा क्षेत्रासाठी भरगोस काम करण्याची तयारी महाविकास आघाडीची आहे हे लक्षात येते.
- सुनिल गव्हाणे
शहराध्यक्ष,
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,
पिंपरी चिंचवड शहर ( जिल्हा)