करूणा व वात्सल्याची मूर्ती उर्मिला कराड प्रा. रतनलाल सोनग्रा यांचे मतः कवयित्री उर्मिला कराड यांना वत्सल माता गुरूमाई पुरस्कार प्रदान

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



 







कृपया प्रसिध्दीसाठी                                                       दि.  2 मार्च 2020


करूणा व वात्सल्याची मूर्ती उर्मिला कराड
प्रा. रतनलाल सोनग्रा यांचे मतः कवयित्री उर्मिला कराड यांना वत्सल माता गुरूमाई पुरस्कार प्रदान

पुणे, दि. 2 मार्चः “ करूणा, वात्सल्य व सर्वांना प्रेम करणार्‍या माणसांच्या आधारामुळेचे  या सृष्टीचा डोलारा उभा असतो. या आकाशाला टिकविण्याचे कार्य आणि आपले माणसे सुगंधीत करण्याचे कार्य कवयित्री उर्मिला विश्वनाथ कराड यांनी केले आहेत.” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी व्यक्त केले.
सूरसंगम परिवारातर्फे महाराष्ट्र साहित्य परिषद येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री सौ. उर्मिलाताई विश्वनाथ कराड यांना ‘वत्सल माता गुरूमाई’ हा पुरस्कार पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांच्या पत्नी मोनिका मोहळ व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सुधाकर पाटील दराडे, माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि प्रसिद्ध संगीतकार व गायक पं. रविंद्र यादव हे उपस्थित होते.
उर्मिला विश्वनाथ कराड म्हणाल्या,“वत्सल माता गुरूमाई पुरस्कारामुळे आज मी अनेकांची आई बनून मला मातृत्व मिळाले. जीवनात बाबा आमटे, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शेलार मामा यांच्यासारखे अनेक महान विभूतींचा सहवास मिळाला आहे. त्यामुळे माझे जीवन समृध्द झाले आहेत. आई वडिलांच्या आर्शिवादाने मला वारकरी घराणे मिळाले. रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेम करणारे जवळचे असतात. आजचा दिवस माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे.”
रंगनाथ नाईकवाडे म्हणाले,“अनेकांच्या आधार बनलेल्या कवयित्री यांच्या संगतीमध्ये जे राहिले त्यांचे जीवनाला सोन्याची झळाळी आली आहे. देवी सरस्वती व लक्ष्मी कधीही एकत्र नसतात परंतू उर्मिला कराड यांच्यामुळे या परिवारात दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या बरोबर त्या सदैव सावली सारख्या असतात. त्यांच्यामुळेच आज डोलारा उभा राहिलेला आहे.”
चंद्रकांत महाराज वांजळे म्हणाले,“समाजाचे काही देणे आहे ही भावना ठेऊन कवयित्री उर्मिला यांनी सदैव समाजाला काहीतर देत राहिल्या. ही भावना म्हणजे अंतरंगाची साधना करणार्‍यांनांच मिळते. आपण सरस्वतीच्या उपासक आहात.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“आमच्या आईमुळेच डॉ. विश्वनाथ कराड यांना आधार मिळाला. त्या उच्च शिक्षित असूनही त्यांनी संपूर्ण घर परिवार सांभाळून एमआयटीचा डोलारा उभा करण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावली आहे. ”

या प्रसंगी स्वरविमल प्रस्तुत ‘गुणवंतांच्या सहवासात’ हा कार्यक्रम संगीतकार व गायक प. रविंद्र यादव यांनी एक अनोखा संगीत काव्यात्मक अविष्कार सादर केला. यामध्ये कवयित्री उर्मिला कराड लिखित कवितांवर आधारित गीत सादर केले गेले.
यावेळी गायिका चारूलता बेलसरे, भगवान महाराज कराड, प्रकाश सुतार, प्रज्ञाचक्षु गणपतराव महाराज जगताप, डॉ. अचर्ना पाटील, वि.दा. पिंगळे व ज्योतीराम कदम यांचा विशेष  सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ललिता देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रास्ताविक श्रीपाद कोंडे देशमुख यांनी केले. विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले.


जनसंपर्क विभाग,
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे.

फोटोः 986
ज्येष्ठ कवयित्री सौ. उर्मिलाताई विश्वनाथ कराड यांना वत्सल माता गुरूमाई पुरस्कार प्रदान करतांना मोनिका मोहळ व प्रा. रतनलाल सोनग्रा. डावीकडून श्रीपाद कोंडे देशमुख. चंद्रकांत वांजाळे, नाईकवाडी व गायिका चारूलता बेलसरे

फोटोः 1003
ज्येष्ठ कवयित्री सौ. उर्मिलाताई विश्वनाथ कराड यांना वत्सल माता गुरूमाई पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्र्रसंगी डाविकडून राहुल विश्वनाथ कराड, सौ. मोनिका मुरलीधर मोहळ, पं. यादव, सौ. उर्मिला कराड, प्रा. रतनलाल सोनग्रा, डॉ. सुधाकर दराडे पाटील व इतर







 


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*