एकला ' सोलो '  रे !*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*एकला ' सोलो '  रे !*
.................................................
(  "म.टा. संवाद पुरवणीतील  आदित्य दवणे यांच्या लेखातून )
.........................................
आता या एकटं फिरण्याची संकल्पना नेमकी काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. मी जेव्हा माझे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो, तेव्हा अनेकदा प्रश्न विचारला जातो- 'तू एकटा फिरतोस, मग तुझे फोटो कोण काढतं? 
कुणीतरी तुझ्यासोबत असलं पाहिजे.


 तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध काही करायला गेलात, की असे 'कुणी तरी'वर जोर देणारे शंकासूर (ज्यांना बुद्धिमत्ता नुसार शंका येतात) निपजणार, याची तयारी आपण ठेवायला हवी, तशी ती माझी असते म्हणून मी उत्तर देतो- 'एकटं किंवा सोलो फिरणं म्हणजे जगाला वेगळं करून तपश्चर्येसाठी खडक शोधणाऱ्या योग्यासारखं एकल फिरणं नव्हे. तुम्हाला अशा मुसाफिरीत तुमच्याचसारखे, तुमच्या समान मनोवृत्तीचे, (कधीकधी) स्वतःच्या शोधार्थ निघालेले, 'me time' शोधणारे अनेकजण भेटतात; त्यातले काही तुमचे मित्र होतात. 


त्यांच्यासोबतच्या
संभाषणातून प्रवासातील त्यांच्या आणि तुमच्या पुढल्या मुक्कामाचं ठिकाण एकच आहे असं कळतं आणि मग असे कुठल्याही बंधनात न अडकवणारे, सगळ्या प्रकारची मुक्तता स्वतः पाळणारे, समोरच्याला पाळू देणारे, नवे मुसाफिर मित्र तुमच्यासोबत प्रवास करू लागतात. ज्याक्षणी असं वाटतं की आता मला वेगळा मार्ग निवडायला हवा, तेव्हा तो निवडण्यासाठी तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र असता आणि मग निरोपाचं आलिंगन देऊन तुम्ही दोघे आपापल्या वाटेवर आनंदानं चालू लागता !................................................
*दीपक बीडकर यांची रविवारीय वाचनसभा*.
_वाचन संस्कृतीला समर्पित उपक्रम_


प्रबोधन माध्यम( न्यूज एजन्सी), पुणे 


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*