नेरळ मध्ये मुस्लिम-बोहरी समाज आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नेरळ मध्ये मुस्लिम-बोहरी समाज आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

कर्जत,ता.30 गणेश पवार

                    राज्य सरकारने आवाहन केल्याप्रमाणे नेरळ येथील मुस्लिम आणि बोहरी समाज यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.तब्बल 61 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य करून रक्तदान शिबिर यशस्वी केले.

               नेरळ गावातील सम्राट नगर भागातील बोहरी मशीद परिसरात नेरळ मुस्लिम-बोहरी समाजाचे वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिराचे उदघाटन नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांचे हस्ते झाले.त्यावेळी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नेरळ चे माजी सरपंच आयुब तांबोळी, तसेच जयेद नजे,तहेसिन सहेद, माजी सरपंच आवेश जुवारी,आदी प्रमुख तसेच राजेश गायकवाड, आबा पवार,दिनेश सदावर्ते, सलीम तांबोळी,नोमान नजे,आदी उपस्थित होते.मुंबई येथील रेडक्रॉस सोसायटी च्या रक्तपेढीच्या माध्यमातून रक्त संक्रमण करण्याचे काम केले. रेडक्रॉस सोसायटीचे सुशीलकुमार हेवाले,डॉ प्रमोद वाझरेकर, सहायक रणजित निकम त्रिवेणी खट्टण,विद्या महाबळे,हेमंत वाडकर,रवींद्र साळुंखे,नितीन चव्हाण,यांनी रक्त संक्रमण करण्याचे काम केले.त्यावेळी राज्यात असलेली संचारबंदी लक्षात घेऊन सोशल डिस्टन्स लक्षात घेऊन रक्तदाते यांना दोन मीटर लांब ठेवून रक्तदान केले जात होते.तर रक्तदान करण्यासाठी आलेले रक्तदाते यांना वेगवेगळ्या खोलीत बसवून ठेवले जात होते.शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले.हे शिबीर यशस्वी व्हावे यासाठी तौसीफ मुल्ला,हनिफ शेख, अलकाश मुल्ला,अबीद सहेद,जयेद शेख आदीसह अनेक कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.