*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
वृक्षरोपण करून झाडे लावा झाडे जगवा संदेश देत विशेष मुलांनी साजरी केली होळी.
होळी हा सण निराशा दूर करून नवीन उत्साहाने वर्षाची सुरुवात करण्याचा सण आहे. होळी सण घरो-घरी लाकडे व शेणाच्या गौऱ्या जाळून केला जातो. यामध्ये एका दिवसात हजारो झाडे तोडली जातात. सण साजरे करावे परंतु निसर्गाची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. एक गाव एक होळी केल्यास किंवा घरोघरी होळी करण्याऐवजी परिसरात एक होळी केल्यास व त्या दिवशी सामूहिक वृक्षरोपण केल्याने पर्यावरणाची हानी होणार नाही. व आपले सण देखील कोणत्याही बंधनाशिवाय चांगल्या प्रकारे पार पडू शकतील.असे अमित बागुल म्हणाले.
यावेळी पर्यावरण पूरक भट्टीचे उदघाटन अमित बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. हि भट्टी समुचित संस्थेचे डॉ आनंद कर्वे यांनी तयार केली असून यामध्ये झाडांचा पाला जाळून त्यापासून निर्जंतुक पावडर तयार केली जाते. यापासून या विशेष मुलांना रोजगार उपलब्ध होणार असून पर्यावरणपूरक असलेली हि भट्टी पुणे शहरात सोसायट्यांमध्ये दिल्यास शहराचा पालापाचोळ्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल असे अमित बागुल म्हणाले.
होळीनिमित्त कामायनी विद्या मंदिर गोखलेनगर या संस्थेतील विशेष मुलांसोबत वृक्षरोपण करून अनोखी होळी साजरी करण्यात आली. यावेळी कामायनी संस्थेचे डॉ. अरविंद कुलकर्णी,नारायण शिंदे,कालिदास सुपाते,पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल, लक्ष्मण कुतवळ, सागर आरोळे,इम्तियाज तांबोळी, संतोष पवार,जयंत तिकोणे,बाबासाहेब पोळके आदी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*