कोंढाणे धरण कर्जत साठी व्हावे यासाठी आंदोलनात आपण आघाडीवर राहणार-सुरेश लाड

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*







कोंढाणे धरण कर्जत साठी व्हावे यासाठी आंदोलनात आपण आघाडीवर राहणार-सुरेश लाड

कर्जत,दि. .2 गणेश पवार

                             कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचे पाणी सिडकोला देण्याचा निर्णय युती सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय कर्जत तालुक्यातील जनतेवर अन्याय करणारा असल्याने या निर्णयाच्या विरोधात कोंढाणे धरण प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.त्यासाठी आंदोलनात पहिली केस घ्यायला आपण तयार असून कोणत्याही परिस्थितीत सिडको ला जागेची मोजणी करू देणार नाही असा इशारा माजी आमदार आणि कोंढाणे धरण संघर्ष समितीचे निमंत्रक माजी आमदार सुरेश लाड यांनी दिला.

                              सदर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कर्जतचे माजी आमदार आणि कोंढाणे धरण संघर्ष समितीचे निमंत्रक,माजी आमदार सुरेश लाड यांच्या आवाहनानुसार खांडपे येथील गीता घारे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये बैठक आयोजित केली होती.बैठकीला रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे,राष्ट्रवादी चे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, प्रदेश प्रतिनिधी भगवान भोईर,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड,माजी नगराध्यक्ष शरद लाड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, सरपंच प्रभावती लोभी,माजी सरपंच मधुकर घारे, आदी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.सुरुवातीला तानाजी चव्हाण यांनी प्रस्तावना करताना कोंढाणे धरणाची पार्श्वभूमी सांगून कोणत्याही स्थितीत हे धरण सिडकोला दिले जाऊ नये यासाठी आंदोलन उभे केले जाणार असून त्यासाठी ठरविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.सुनील गायकवाड यांनी आपल्या परिसरात आधीच पाण्याची टंचाई असते,परंतु कातळदरा भागातील पाणी येथून वाहत जात असल्याने आम्ही नदीमध्ये पावसाळ्यानंतर दोन महिने पाणी तरी बघतो.मात्र सिडको ला धरण विकले तर नदी पूर्णपणे बंद होईल आणि आम्हाला येथून दुसरीकडे राहायला जावे लागेल अशी भीती व्यक्त केली.

                                रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आम्ही मातीचे बंधारे बांधतो म्हणून आता नदीमध्ये पाणी तरी दिसत आहे.पण मोरबे धरणाच्या खाली असलेली चौकच्या नदी मध्ये पाण्याचा थेंब दिसत नाही.अशी अवस्था आपल्या उल्हासनदीची करायची नाही आणि त्यासाठी आंदोलन करावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.दुसरीकडे सिडको ने काहीही करायचा निर्णय घेतला तरी आम्ही धरणाचे पाणी नवी मुंबईत जाऊ देणार नाही असा ठाम विश्वास घारे यांनी व्यक्त केला.माजी आमदार सुरेश लाड यांनी बोलताना आपण आमदार असताना नवी मुंबई साठी चावणी येथे धरण व्हावे यासाठी आग्रही होतो,परंतु त्यावेळी राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने जाणीवपूर्वक त्या मागणी कडे दुर्लक्ष केले होते.असा आरोप करून कोंढाणे येथील धरण ही कर्जत तालुक्याची गरज असून कर्जत तालुक्यात होत असलेल्या नवीन वसाहती आणि स्थानिक यांच्यासाठी ही गरज असून त्या मागणी साठी आता आपण या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटून कोंढाणे धरणाची गरज तालुक्यासाठी लक्षात घेऊन धरण सिडकोला देऊ नये आणि शासनाने धरण सिडको ला देण्याचा निर्णय रद्द करावा ही मागणी करणार असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी यापुढे शासनाने निर्णय जाहीर करिपर्यंत सिडको चा एकही अधिकारी धरण परिसरात मोजणी करण्यासाठी दिसल्यास कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल,पण आपण मोजणी होऊन देणार नाही असा इशारा सुरेश लाड यांनी दिला. त्याचवेळी यापुढे कोंढाणे धरण कर्जत तालुक्यासाठी झाले पाहिजे आणि ते दुसऱ्यांसाठी नसेल असेल तर आपण आघाडीवर राहून आंदोलन करू असे आश्वासन सुरेश लाड यांनी उपस्थित शेतकरी यांना दिले.

 

 

फोटो ओळ 

बैठकीत बोलतांना

छाय ः गणेश पवार


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆





*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*