*केवळ 'स्माईल डिझाईन' म्हणजे डेन्टिस्ट्री(दंत वैद्यक शास्त्र) नव्हे !  ~ डॉ . जे. बी. गारडे*  -------------------- दंत शास्त्र ला दुय्यम मानू नये,मुख आरोग्य हा पूर्ण शरीराचा आरसा ~ डॉ . जे. बी. गारडे

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


press release


*केवळ 'स्माईल डिझाईन' म्हणजे डेन्टिस्ट्री(दंत वैद्यक शास्त्र) नव्हे !  ~ डॉ . जे. बी. गारडे* 
--------------------
दंत शास्त्र ला दुय्यम मानू नये,मुख आरोग्य हा पूर्ण शरीराचा आरसा ~ डॉ . जे. बी. गारडे


पुणे :


केवळ 'स्माईल डिझाईन' म्हणजे डेन्टिस्ट्री(दंत वैद्यक शास्त्र) नव्हे ! दंतशास्त्रला दुय्यम मानू नये,कारण  मुखआरोग्य हा पूर्ण शरीराचा आरसा असते',असे प्रतिपादन एम ए रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस(पुणे कॅम्प)चे ओरल,मॅक्झिलोफेशियल सर्जरी विभागप्रमुख डॉ.जे.बी.गारडे यांनी आज केले. 


'नॅशनल डेंटिस्ट डे' भारतात ६ मार्च रोजी साजरा केला जातो,या दिनाच्या पूर्वसंध्येला आझम कॅम्पस येथे झालेल्या व्याख्यानात डॉ.गार्डे बोलत होते. 


ते म्हणाले ,'दंतशास्त्र ही वैद्यकीय शाखा दातांच्या आरोग्यासाठी असली तरी ती संपूर्ण शरीराच्या आरोग्यसाठी महत्वाची आहे.मुख आरोग्यावर जणू चांगले जीवन अवलंबून असते. चांगल्या शरीरयष्टीसाठी चांगले दात आवश्यक आहेत. केवळ 'स्माईल डिझाईन ' म्हणजे डेन्टिस्ट्री नव्हे ,तर शरीराला विविध आजारांचा आरसा दाखवणे हे दंत शास्त्राचे काम आहे. जीवनसत्व कमतरता,विविध रोगांच्या,कर्करोगाच्या गाठी, चेहऱ्यावर-हिरड्यांवर दिसून येतात. त्यातून अनेक विकारांचा छडा लागतो. हृदयाची ,डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मुख आरोग्याच्या संदर्भात दंत वैद्यकाचा सल्ला घ्यावा लागतो. 


  दंतोपचार शाखा महागडी नाही 


दंतोपचार शाखा महागडी आहे,असा गैरसमज आहे,हा समज चुकीचा असल्याचे सांगून डॉ. गारडे म्हणाले,'जर आपण वेळेत दातांची कीड पाहिली तर कमी वेळेत -कमी खर्चात उपचार होतात. आज दंत शास्त्राने मोठी झेप घेतली आहे. लेसर पासून मायक्रोस्कोप,कॅड कॅम ,स्कॅनर अशी अत्याधुनिक साधने ,उपचार उपलब्ध आहेत. दात काढणे,बसवणे इतकेच नाही तर वेडेवाकडे दात सरळ करणे,हिरड्यांचे विविध आजार बरे करणे,जीभ,पडजीभ,ओठ ,गाल यांचे आरोग्य दंत वैद्यक पाहतो. 


दंत वैद्याला साऱ्या शरीराच्या आरोग्याचा पत्ता लागतो. सर्व विकार,आजार,शस्त्रक्रिया यांना विमा लागू असला तरी,दंत उपचार आणि शस्त्र क्रियांसाठी उपलब्ध नाही,ही मोठी उणीव आहे. पाश्चात्त्य देशात विमा लागू आहे,हे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय दंतोपचार वैद्यकीय शाखा अतिशय स्वस्तात उपचार उपलब्ध करून देते. परदेशात अक्कलदाढ काढायला  दीड लाख खर्च येतो,भारतात साधारण ३ हजारात हे काम होते. 


दंत वैद्यक शाखा दुय्यम मानू नका 


दंत वैद्यक या वैदयकिय शाखेला दुय्यम मानले जाते. समाजात फारशी प्रतिष्ठा नाही. सरकारी नोकऱ्यांत जागा नाही. ग्रामीण भागात दवाखाना चालणे अवघड आहे आणि स्वतःचा दवाखाना काढणे महागडे काम असल्याने अनेक तरुण परदेशात जाणे पसंत करतात. स्वतःचे क्लिनिक काढणे हा शहरात  कोट्यवधी खर्चाचा मामला असतो. उपचाराची साधने,उपकरणे,मटेरियल इंपोर्टेड आणि महाग असते,अशी माहितीही डॉ. गारडे यांनी या व्याख्यानात दिली. 


मौखिक आरोग्य विषयक जागरूकता ग्रामीण  भागात पोचणे अधिक आवश्यक आहे. पण,सरकारी रुग्णालयात दंत वैद्यकाला जागा कमी असतात.थुंकणे ही घातक सवय आहे,गुटखा खाण्याने पिढीच्या पिढी बरबाद होत आहे ,याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. 
    
  दंतवैद्यक शास्त्राची विशेष शाखा  


 ओरल व मॅक्झिलोफेशियल Surgery दंतवैद्यक शास्त्राची ही एक विशेष शाखा आहे. तोंडाच्या तसेच चेहऱ्याच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया हे ओरल व मॅक्झिलोफेशियल सर्जन करतात. 


थोडक्यात सांगायचे तर अडकलेली अक्कलदाढ काढणे, डेंटल इंप्लान्ट रोपण करणे, जबड्याच्या वा चेहऱ्याच्या हाडांचे फ्रॅक्चर जोडणे, दुभंगलेले ओठ व टाळू दुरुस्त करणे, जबड्याच्या व चेहऱ्याच्या रचनेतील वैगुण्य दूर करणे, जबड्याच्या हाडांतील ट्युमर / कर्करोग काढून तिथे नवीन हाडाचे रोपण करणे, सबम्युकस फायब्रोसिस (गुटखा खाऊन तोंड उघडता न येणे) तसेच जबड्याचे सांधे निखळणे, सांधा आखडणे (Ankylosis), लुडविग अंजायना (जबड्यातील जंतुसंसर्ग घशात पसरणे) अश्या अनेक आव्हानात्मक व अवघड शस्त्रक्रिया ओरल सर्जन्स करतात.



आज आपल्या देशात तोंडाच्या व फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे ही माझ्या दृष्टीने अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. संशोधनाच्या आधारे हे आता सिद्ध झाले आहे की तंबाखूचे सेवन हे ह्या भयंकर रोगाचे कारण आहे. पान मसाले, गुटखा, सुपारी, मावा, तपकीर, जर्दा, विडी, सिगारेट तसेच दात साफ करण्यास वापरली जाणारी भाजलेल्या तंबाखूची मिश्री अश्या कुठल्याही स्वरूपातील तंबाखूच्या सेवनाने तोंडाचा, गालाचा, जिभेचा, घश्याचा वा फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो.  तरुण लोकांमध्ये ह्या वाईट सवयी जास्त दिसून येतात ही अतिशय गंभीर बाब आहे. आज संपूर्ण जगात सर्वात जास्त तरूण कुठे उपलब्ध असतील तर ते आपल्या भारतात.. तेव्हा जर हे तरुणच अश्या घातक व्यसनांना बळी पडून आयुष्य उध्वस्त करत असतील तर आपल्या प्रिय भारतमातेने कुणाकडे पाहावं ? 
                    तोंडाच्या कर्करोगाची थोडक्यात लक्षणे सांगायची झाली तर तोंड उघडावयास त्रास होणे, गालात पांढरे चट्टे येणे, मोठी सूज, तोंडाची आग-आग होणे तसेच बराच काळ बरी न होणारी जखम अशी असतात. अश्या प्रकारची कुठलीही लक्षणे दिसून आली तर तातडीने तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. वेळेत व योग्य उपचार केले गेले तर हा कर्करोग नक्की बरा होऊ शकतो.


दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय 


सर्वांना हसरा चेहरा प्रिय असतो दातांच्या स्वास्थामुळे हसरा चेहरा अधिकच सुंदर दिसतो त्यामुळे दातांचे आरोग्य टिकविणे फार जरुरी आहे दातांचे आरोग्य ठीक नसल्यास अनेक आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे दैनिक दिनचर्येत दातांचे आरोग्य टिकविणे जरुरी आहे.


दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय


1. चांगल्या प्रकारे दात घासावेत –


आपल्या दातांना दररोज सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी नियमित ब्रश करणे फार जरुरी आहे. दातांमध्ये दिवभराची घाण जमलेली असते त्यामुळे रात्री झोपण्याआधी ती घाण साफ करणे आवश्यक असते सकाळी ब्रश केल्याने दिवसभर मुखात दुर्गंधी राहत नाही ताजेतवाने वाटते.


ब्रश ची निवडही योग्य असावी तसेच योग्य पेस्ट ची ही निवड करावी.


तोंडात प्रत्येक भागात दातांची साफसफाई करण्यास किमान पाच मिनिटे द्यावीत दातांची भतत आपल्या जिभेची ही साफसफाई करणे फार जरुरी आहे त्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होते. काही लोक दिवसातून जेवढ्या वेळा अन्न ग्रहण करतात त्यानंतर ब्रश करतात ही एक चांगली सवय आहे परंतू आपण किमान दिवसातून दोन वेळा तरी ब्रश करावा.


2. दातांची अंतर्गत सफाई –


दातांची अंतर्गत सफाई करणे फार जरुरी आहे यासाठी रेशमी धागा घेऊन तोंडात समोरील दातांच्या फटीमधील घाण बाहेर काढण्यास मदत होते.


ज्या ठिकाणी ब्रश पोहोचू शकत नाही व या ठिकाणाची सफाई माऊथवॉश ही करू शकत नाही त्यासाठी ही प्रक्रिया करणे जरुरी आहे परंतु यात फार वेळ जातो आठवड्यातून किमान दोन वेळा ही प्रक्रिया नक्की करावी.


3. माऊथवॉश चा वापर –


माऊथवॉश चा वापर करणे खर्चिक पण चांगली सवय आहे. माऊथवॉश मुळे तोंडातील अपायकारक जीवाणू दूर केले जातात अडकलेल्या पदार्थांचा दुर्गंधी नष्ट होतो व दातांना पोषण मिळते. आपला माऊथवॉश मध्ये लीस्त्रीन व क्लोरिनची मात्र चांगली असायला हवी. ब्रश केल्यानंतर माऊथवॉश दातांना निरोगी बनवण्यास नक्कीच मदत होते. माऊथवॉश ने आपणास ताजेतवाने वाटते आपल्या मुखातून चांगला गंध येतो.


4. कॅल्शियम व जीवनसत्वे युक्त पेस्टचा वापर –


बाजारात कॅल्शिअम व जीवनसत्त्वे युक्त पेस्ट असल्याचा दावा बरेच ब्रेंड करतात परंतु तुम्ही या सर्वांमध्ये योग्य ब्रेंड ची निवड करावी वापरल्यामुळे फायदा होत असल्यावरच त्याचा वापर सुरू ठेवावा.


5. कॅल्शियम व जीवनसत्वे युक्त आहार –


आपल्या आहारात कॅल्शियम युक्त पदार्थाचे सेवन जास्त करावे गोड पदार्थाचा वापर कमी करावा खाल्ल्यानंतर पाण्याने गुळणी करून दातांची काळजी घ्यावी. दही, दुध, संत्रा ज्यूस, सुकामेवा, हिरव्या भाज्या यांचा वापर जास्त करावा. दात सडण्यापासून वाचवण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त पदार्थाचा वापर करावा लहान मुलांमध्ये दातांची वाढ नीट ठेवण्यासाठी त्यांना जीवनसत्वे युक्त आहार नक्कीच द्यावा. कॉपर,झिंक,आयोडीन आणि पोटॅशियम युक्त आहार घ्यावा.


6. आपल्या जिभेचे साफ करावे –


आपल्या जिभेस साफ करावे कारण खाल्लेला पदार्थांचे सूक्ष्म कण जिभेवर राहतात त्यामुळे मुखाची दुर्गंधी सारखे विकार होऊ शकतात दररोज जिभेची योग्य प्रकारे साफसफाई होणे जरुरी आहे


7. तंबाखू खाऊ नये –


तंबाखूमध्ये निकोटिन असते त्यामुळे आपले मुख दुर्गंधीने व अपायकारक घटकांचे निशाण्यावर येते तंबाखू मुखाच्या कर्करोगासाठी जो मुख्यतः दातांच्या सडन्यामुळे जास्त वाढतो त्याची सुरुवात दात सडणे व त्यातून रक्तही येण्यापासून सुरू होते. तंबाखू सेवनामुळे मुखाचा आंतरिक भागाशी संबंधित रोगांची होण्याची शक्यता वाढते.


8. सोडा, कॉफी आणि मद्य यांचे सेवन शक्यतो फार कमी करावे –


सोडा, कॉफी आणि मद्य यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण फार असते त्यामुळे हे आपल्या दातांच्या आरोग्याला अपायकारक मानले जाते त्यामुळे यांचे सेवन कमी करावे


9. दातांच्या दुखण्यास दुर्लक्ष करू नये –


दातांमध्ये दुखण असल्यास त्याचीही तपासणी व उपचार घेणे आपली प्राथमिकता असायला हवी. कोणतही दुःख दुर्लक्ष करू नये त्यामुळे समस्त वाढून मोठ्या समस्याची निर्मिती होते त्यामुळे दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी दातांच्या तज्ज्ञांना दाखवावे.


10. दातांची नियमित तपासणी –


आपल्या दातांचे नियमित तपासणी करून घ्यावी त्यामुळे होणारा समस्यांचे निराकरण करता येते डॉक्टरांचा सल्ला नेहमीच पाळा व त्यानुसार आपली दिनचर्या असावी.


दात आपल्या सौंदर्याचा एक अभिन्न अंग आहे त्यामुळे त्यांचे सौंदर्य टिकवणे फार जरुरी आहे.
--------------------------


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*