PUC certificate हे PUC सेंटर वर online काढून मिळते

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


बऱ्याच जणांना हे माहीत नसेल की आता सरकारी नियमाप्रमाणे गाडीचे  PUC certificate हे PUC सेंटर वर online काढून मिळते, नुकतेच माझ्या कार चे PUC संपल्यामुळे PUC काढण्याचा योग आला,मी अलिबाग पेण रस्त्यावरील पेण जवळ हाय वे ला जे PUC सेंटर आहे तिथे गेलो,तिथे संबंधित व्यक्तीने त्याच्या कॉम्प्युटरवर माझ्या कारचा नंबर टाईप केला व नंतर त्यात options होते,BS1,BS2,BS3,BS4,BS6 etc.,त्या व्यक्तीने BS3,सिलेक्ट केले,मी लगेच त्याला सांगितले की माझी कार BS4 आहे,पण तो BS4 ऑपशन सिलेक्ट करायला तयार नव्हता,पण मी त्याला BS4 ऑपशन सिलेक्ट करायला लावले कारण माझी कार BS4 मानांकित होती,त्याला अधिक माहिती विचारली असता तो कारणे सांगू लागला की BS4 गाडी घेतल्यापासून फक्त 2 वर्षेच valid असते वगैरे.पण त्याला मी इंजिनिअर असल्याचे सांगितले आणि असे काही नसते हे पण सांगितले, पण तो असे का करतो याची अधिक चौकशी केली असता खरे कारण कळले की की BS3 चे PUC सर्टिफिकेट फक्त सहा महिन्यांसाठी valid असते व BS4 नामांकित PUC सर्टिफिकेट हे पूर्ण एक वर्षांसाठी valid असते.तेव्हा कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला,म्हणजे आपण आपली गाडी वर्षातून दोन वेळा PUC साठी त्यांच्याकडे घेऊन येणार शिवाय PUC सहा महिन्याने expire झाल्यावर ट्रॅफिक पोलिसाने पकडल्यावर दंड पडेल तो वेगळाच.
तसेच PUC ची अधिकृत फी ही रु.110आहे,यापेक्षा जास्त रक्कम देऊ नका.
सांगण्याचे तात्पर्य असे की ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे जेणे करून होणारी संभाव्य फसवणूक टाळता येईल


कृपा करून हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही विनंती (///शेखर जाधव मित्र परिवार ////)


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*