चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे आणि म्युझियम बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे आणि म्युझियम बंद ठेवण्याचे
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश


          पुणे, दि.16-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या क्षेत्रातील व ग्रामीण क्षेत्रातील सुध्दा चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा, नाटयगृहे आणि म्युझीयम ३१ मार्च  2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी  तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले.
        राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार 15 मार्च 2020 पासून लागू करुन खंड २,३ व  4 मधील तरतूदीनुसार  अधिसूचना व नियमावली निर्गमित केली आहे.
००००