कलोत्सव २०२०' : इनामदार कॉलेज मध्ये चित्रकला,ग्राफिक्स,ऍनिमेशन कलांचे प्रदर्शन*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


Press release


*'कलोत्सव २०२०' : इनामदार कॉलेज मध्ये चित्रकला,ग्राफिक्स,ऍनिमेशन कलांचे प्रदर्शन*
-------------
*धनश्री हेबळीकर, आदित्य बीडकर यांच्या हस्ते  ६ मार्च रोजी उद्घाटन* 
  
पुणे :


महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट,ड्रॉईंग अँड ऍनिमेशन'(वेदा) आयोजित 'कलोत्सव २०२०' या चित्रकला,ग्राफिक्स ,डिझाईन,ऍनिमेशन कला महोत्सवाचे उदघाटन 'स्वतंत्र थिएटर' च्या सहसंस्थापक धनश्री हेबळीकर,युवा कलाकार आदित्य बीडकर आणि 'प्रबोधन माध्यम'चे संचालक दीपक बीडकर यांच्याहस्ते ६ मार्च रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.आझम कॅम्पस मध्ये हा कलोत्सव होणार आहे.  


  'पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट,ड्रॉईंग अँड ऍनिमेशन' च्या संयोजन समितीच्या वतीने प्राचार्य डॉ.ऋषी आचार्य,स्वतंत्र जैन,ताहेर खान यांनी ही माहिती दिली.   


या एकदिवसीय महोत्सवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.चित्रकला,ग्राफिक्स,शिल्पाकृती,२-डी,३-डी ऍनिमेशन कलांचा या  प्रदर्शनात समावेश आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ६ निवडक ऍनिमेशन शॉर्ट फिल्म दाखविल्या जाणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाला आशिष कुलकर्णी,करिष्मा वाबळे उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. 
---------------------


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*