*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*आयुष्यात काय कमवायचे हे शिकायचे असेल ना तर भाऊंच्या कारकीर्दीवर एक दृष्टीक्षेप टाकाच*....
*कोथरूडचे शिल्पकार - शशिकांतभाऊ सुतार* काल भाऊंच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त *मी व सौ.मंजुश्री* त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी थोडे उशीरानेच गेलो ( रात्रौ ८:४५ च्या सुमारास ) गर्दी कमी झाली असेल या अपेक्षेला गल्लीत घुसताच छेद गेला आणि मग २०० /२५० लोकांच्या गर्दीतून वाट काढत भाऊंची भेट घेताना ३०/३५ वर्षांचा इतिहास डोळ्यांपुढे तरळला !! त्याकाळी आम्ही *पतित पावन संघटनेच्या कामात होतो* / कडवे हिंदुत्ववादी आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध संघर्षाचे बाळकडू घेऊन काम करताना कोथरूड मधे (तेव्हाचे शिवाजीनगर ) भक्कमपणे उभ्या असलेल्या शिवसेनेशी आमचा उभा दावा ( अगदी रसिकावहिनींच्या विरोधात मनपा निवडणूक लढविण्याइतका )
पण या सर्व परिस्थितीत ही *भाऊंनी कधी वागण्याबोलण्यातून कटुता येउ दिली नाही*....चेहऱ्यावर सतत धीरगंभीर भाव बाळगणारे भाऊ कधी तोल सोडून वागलेले मी बघितले नाही / कधी प्रसिद्धीसाठी तडफडले नाहीत का कधी कोणाला चारचौघात फटकारताना मी बघितले नाही / *साधेपणा हे तर भाऊंचे आभूषण जणू* पांढऱ्या पायजमा कुर्त्यात वावरणाऱ्या भाऊंना कधी *ग* ची बाधा झालेली ही मी बघितली नाही..... १९७४ / १९७९ आणि १९८५ साली असे सलग तीन वेळा महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या *भाऊंनी* पालिकेत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता अशा विविध पदांवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
*१९९० मध्ये पहिल्यांदा आमदार* म्हणून निवडून आले आणि *१९९५ मध्ये दुसऱ्यांदा आमदार* म्हणून निवडून आल्यावर युती सरकार मधे त्यांची कृषिमंत्री पदी निवड झाली.... त्यांच्या दैदिप्यमान कारकीर्दीचा चरमोत्कर्ष म्हणजे *विकास आराखड्याप्रमाणे कोथरूड चा नियोजनबद्ध विकास* / वेगाने विकसित होणारे उपनगर म्हणून जगाने दखल घेतली - आणि *छत्रपती शिवाजी महाराजांच्या* कोथरूड मधील पुतळ्याची स्थापना ही भाऊंचीच ,ज्ञानी झैलसिंग यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले - असे कोथरूडचे भूषण असलेल्या भाऊंनी राजा शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारलेल्या शाळा असोत किंवा मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून केले जाणारे समाजकार्य,प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवला....
विविध संस्था उभारत असताना त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे शिवसेनेचे उपनेते म्हणून शशीकांतभाऊ कायम चर्चेत राहिले.
आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जुने सहकारी म्हणून भाऊ सर्वांच्याच आदरास पात्र ठरले.
त्यांना असलेली आध्यात्मिक ओढ,अतिशय नियोजनबद्ध दिनक्रम आणि जोडलेले हजारो स्नेही.... यामुळेच कोणतेही सत्तेचे पद नसताना *भाऊंच्या* वाढदिवसाच्या निमित्ताने आजही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी अलोट गर्दी होते....खरेतर भाऊंवर लिहायला अनंत आठवणींचा साठा आहे माझ्याकडे पण तूर्तास *त्यांच्या स्फूर्तिदायक जीवनयात्रेचा शतकमहोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभो* याच सदिच्छा....
🕉🙏🚩💐🕉
*संदीप खर्डेकर*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*