राज्यसरकारने KG टू PG  मोफत व दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे... संभाजी ब्रिगेड*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेसनोट....


*राज्यसरकारने KG टू PG  मोफत व दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे... संभाजी ब्रिगेड*


सावित्रीबाई फुले ही विद्येची खरी देवता आहे. आपल्या शिक्षणाचं पहिले विद्यापीठ. परंतु आजची स्त्री सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना, त्यागाला विसरली. 'ती' अंधश्रद्धे मध्ये गुरफटून जाऊन कर्मकांडाच्या नादी लागली. 'ती' चूल आणि मूल याच्यात धन्यता मानत राहिली. म्हणून ती घराच्या बाहेर पडली नाही. पुरुष प्रधान संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान दिलं गेले. परंतु सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक चळवळीमुळे या देशाची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील बनवू शकल्या, त्याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक चळवळीला आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली नसती तर आज महाराष्ट्र सह देशाची काय परिस्थिती असती ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. महिलांचा कर्तृत्वाचा इतिहास आहे. अन्याय अत्याचार सहन करण्यापेक्षा महिलांनी सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभं राहून कणखर, कठोर व सक्षम बनले पाहिजे... अशीच संभाजी ब्रिगेड ची भूमिका आहे. प्रत्येक महिला व मुलींच्या कायम पाठीशी संभाजी ब्रिगेड असेल. महिलांनी स्वकर्तुत्वावर स्वतःची ओळख निर्माण करावी, हीच सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाची खरी आदरांजली ठरेल... असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.


*'राज्यसरकारने KG टू PG  दर्जेदार व मोफत शिक्षण दिले पाहिजे. सरकारने शिक्षणावर जास्तीत जास्त पैसा खर्च करून सर्व मंदिरांचे राष्ट्रीयीकरण करून तो पैसा गोर-गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरला पाहिजे. अशीच संभाजी ब्रिगेड ची भूमिका आहे. त्याशिवाय देवाला देवपण येणार नाही. 'शिवभोजन' देण्यापेक्षा शिक्षण महत्त्वाचं आहे.'*


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज १२३ वा स्मृती दिन. त्यानिमित्त महात्मा फुले वाड्यावर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे बोलत होते. यावेळी पुणे जिल्ह्यात सचिव महादेव मातेरे, तालुकाध्यक्ष गणेश चऱ्हाटे, पुणे शहर संघटक संजय चव्हाण, उत्कर्षा शेळके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  संजय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कमला नेहरू हॉस्पिटल येथे २०० रुग्णांना मोफत जेवण वाटप करण्यात आले. यावेळी मोफत जेवण वाटप करण्याचे नियोजन सुभाष जाधव यांनी केले होते.


*कृपया महत्वाची बातमी आहे, प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती...*


- संतोष शिंदे,
संभाजी ब्रिगेड, पुणे.