न्यु कोपरे गावाच्या पुनर्वसन प्रक्रीयेतून वळलेल्या कुटूंबांचे तातडीने पुनर्वसन करा*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 


*न्यु कोपरे गावाच्या पुनर्वसन प्रक्रीयेतून वळलेल्या कुटूंबांचे तातडीने पुनर्वसन करा*
............................
  *युवक क्रांती दलाची मागणी पुनर्वसन केल्याशिवाय गावाची जमीन एनडीए ला हस्तांतरीत करू नये*


पुणे.


पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) लागून असलेल्या न्यु कोपरे गावाच्या पुनर्वसन प्रक्रीयेतून वगळलेल्या कुटूंबांचे तातडीचे पुनर्वसन करावे आणि पुनर्वसन केल्याशिवाय गावाची जमीन एनडीएला हस्तांतरीत करू नये, अशी मागणी युवक क्रांती दलाने आज पत्रकार परिषदेत केली .


युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी,कार्यवाह संदीप बर्वे,राज्य संघटक जांबुवंत मनोहर,पुणे शहराध्यक्ष सचिन पांडे,आप्पा अनारसे राज्य सहकार्यवाह ,यल्लापा धोत्रे ,कोपरे ग्रामस्थ या पत्रकार


परिषदेत उपस्थित होते.



काही दिवसांपासून स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि एनडीए चे अधिकारी न्यु कोपरे गावात येवून जमीन मोजणी करीत आहेत. न्य कोपरे गावाच्या पुनर्वसन प्रक्रीयेतून वगळलेल्या सर्व कुटुंबांचे पुनर्वसन पुर्ण झाल्याशिवाय एनडीएला गावाची जमीन हस्तांतरीत करू नये, अशी मागणी आहे.


न्य कोपरे गावाची पुनर्वसन प्रक्रीया गेली २० वर्षे प्रलंबित आहे. या पुनर्वसन प्रक्रीयेत वगळण्यात आलेल्या कुटुंबांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली. डॉ. सप्तर्षी यांनी यासंदर्भात पुनर्वसन प्रकल्पाचे विकसक संजय काकडे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याश चर्चा केली. काकडे यांनी या वंचित कुटूंबांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन न पाळल्याने १७ एप्रिल २०१७ ते ५ मार्च २०१८ या कालावधीत युक्रांदने काकडे यांचे कार्यालय, पुण्यातील विविध चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे ४५ वेळा सत्याग्रही आंदोलने केली. त्यामध्ये आंदोलकांना सुमारे ३५ वेळा अटक झाली. न्यायालयात खटला चालला. दीड वर्षे चाललेल्या खटल्यात सर्व सत्याग्रही आंदोलकांची निर्दोष मुक्तता झाली. ६ मार्च २०१८ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव


यांनी यासंदर्भात आंदोलक आणि विकसक यांची बैठक घेऊन पुनर्वसन प्रक्रीया सुरू करण्याचे आश्वासन दिले. युक्रांदने सुमारे ८८ वंचित कुटूंबांचे रहीवासी पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले. यासंदर्भात युक्रांदने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली. चंद्रकांत पाटील यांचीही युक्रांद ने दोनदा भेट घेतली. या विषयाचा युक्रांद चे कार्यकर्ते मार्च २०१९ पासून दैनंदीन पाठपुरावा करीत आहेत. वंचित कुटूंबांच्या पुनर्वसन प्रक्रीयेला सुरुवात होत नसल्याने फेब्रुवारी २०२० मध्ये डॉ. कुमार सप्तर्षी आणि युक्रांद च्या पदाधिका-यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अर्थमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. १६ मार्च २०२० रोजी डॉ. कुमार सप्तर्षी आणि संदीप बर्वे यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) चे इस्टेट संबंधित अधिकारी कर्नल शहीद यांची भेट घेवून त्यांना हा प्रश्न समजावून सांगितला.


काही दिवसांपासून स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि एनडीए चे अधिकारी न्यु कोपरे गावात येवून जमीन मोजणी करीत आहेत. न्यु कोपरे गावाच्या पुनर्वसन प्रक्रीयेतून वगळलेल्या सर्व कुटूंबांचे पुनर्वसन पुर्ण झाल्याशिवाय एनडीए ला गावाची जमीन हस्तांतरीत करू नये, अशी मागणी युवक क्रांती दल करीत


आहे.


या पुनर्वसन प्रकल्पातील काही ठराविक लोकांनी विकसक संजय काकडे यांच्याशी हातमिळवणी करून कर्वेनगर येथील पुनर्वसन प्रकल्पात सदनिका मिळवल्या आहेत. त्या सदनिका त्यांनी भाडेतत्वावर अन्य रहिवाशांना दिल्या आहेत. पुनर्वसन झाल्यावरही ते गावकरी म्हणून मिरवतात. त्यांची न्यु कोपरे गावातील घरे तशीच शाबूत आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांच्या घरांचे बांधकाम करून ते विस्तारीकरण करीत आहेत.


ज्यांना पुनर्वसन प्रकल्पात सदनिका मिळाली, त्यांची न्यु कोपरे गावातील घरे त्वरीत पाडावीत. तरच ८८ वंचित कुटूंबांचा प्रश्न त्वरीत मार्गी लागू शकेल. शासन, विकसक आणि ज्यांचे पुनर्वसन करायचे ते लाभार्थी यांच्यात २००१ साली विपक्षीय करार झाला. त्यावेळी दुर्बल घटकातील कुटूंबांना हेतूपुरस्सर वगळण्यात आले. ज्या कुटूंबांकडे २००१ पुर्वीचे रहीवासी दाखले आहेत, अशी ८८ कुटूंबे पुनर्वसनापासून वंचित आहेत. त्यांचा रहिवास सिध्द करण्यासाठी युक्रांदने आवश्यक ती शासकीय कागदपत्रे सादर केली आहेत. ती खरी, की खोटी याचा निर्णय शासकीय यंत्रणा गेली २ वर्षे देत नाही, हे निषेधार्ह आहे.


यासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, ही युक्रांद ची मागणी आहे.
..................................