महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या कलाकारांचा नागरिकांना संदेश

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या कलाकारांचा नागरिकांना संदेश


 


सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कलाकारांची वर्क फ्रॉम होम कलाकृती


 


नेहमी सर्वांना हसवणाऱ्या महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या टीमने देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.


सध्या सर्व देशात येत्या काही दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. नागरिकांना घराबाहेर पडायला सक्त मनाई आहे. तरीदेखील आपली सुजाणता विसरून लोक फेरफटका मारायला हमखास बाहेर जातात.


म्हणूनच  सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचे कलाकार, तंत्रज्ञ आणि कार्यक्रमाची  संपूर्ण टीम यांनी मिळून ही कलाकृती सादर केली आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचा मान राखून तरी सर्वांनी घरात बसून स्वतःचं व देशाचं रक्षण करावं असं आवाहन या व्हिडिओमधून महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या कलाकारांनी केलं आहे.


पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा बुध-गुरु रात्री 9 वा फक्त सोनी मराठीवर .