पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरेलू काम करणाऱ्या  महिला कामगारांच्या आरोग्याची  काळजी घेणार तरी कोण ......???

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरेलू काम करणाऱ्या  महिला कामगारांच्या आरोग्याची  काळजी घेणार तरी कोण ?
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशात तसेच महाराष्ट्रात नागरिकांना या विषाणूची लागण होऊ नये म्हणून सर्वच स्तरातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांच्या कामगारांना  पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी पगारी सुट्टी देण्याचे आवाहन  केले असून पुणे शहरात याची पायमल्ली होताना दिसत आहे. तसेच घरोघरी धुण्याभांड्याची, झाडान कामाची कामे करणाऱ्या महिला कामावर जात असून काही सोसायटी व बंगले  मालकांकडून त्यांच्या आरोग्याची कोणत्याही प्रकारची काळजी घेण्यात येत नाही. पुणे शहरात घरेलू कामगारांची संख्या ४ लाखाहून अधिक असून त्यांना कामावर बोलवण्यात येत आहे. घर मालक स्वतःची व घरच्यांची काळजी घेत आहेत. परंतु या घरेलू कामगारांच्या आरोग्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. त्यांना मास्क, सॅनिटायझर व इतर कोणतीही सुविधा देण्यात येत नसून घरेलू कामगारांनी मालकांना सुट्टी मागितल्यास सुट्टी देत नाहीत व घरी राहिल्यास पगार कपात करण्याची किंवा कामावरून काढण्याची धमकी देण्यात येते. कामवरून काढल्यास  त्यांचा उदरनिर्वाह चालणार कसा याचा विचार करून या महिलांना  कामाला जाण्यास भाग पडत आहे. शासनाकडून आवाहन करूनही त्याची अंमलबजावणी  होत नसेल तर या घरेलू कामगारांची काळजी घेणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे असे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल म्हणाले. 
  प्रभागातील महिलांनी हि समस्या मांडली असून पुणे शहरात लाखो महिला भगिनी घरेलू कामगार म्हणून काम करत असून त्यांच्या आरोग्याची  काळजी घेणे गरजेचे आहे. या महिला शहरातील विविध झोपडपट्ट्या व वसाहतींमध्ये वास्तव्यास असल्याने कोरोनाची लागण घरेलू कामगार महिलांना झाल्यास मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होईल त्यासाठी वेळीच उपाय करून शासनाने केलेल्या आव्हानाला मालकांनी प्रतिसाद द्यावा घरेलू कामगार महिलांना ३१ मार्च पर्यंत पगारी सुट्टी द्यावी व कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत करून माणुसकीचे दर्शन घडवावे. 


आपल्या समस्या मांडण्यासाठी प्रभागातील महिला जमा झाल्या होत्या त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शासन यावर योग्य त्या उपाय योजना करतील यासाठी प्रयत्न करून लवकरात लवकर यावर निर्णय होईल अशी अपेक्षा अमित बागुल यांनी व्यक्त केली.  


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*