शिवरायांचे आम्ही मुस्लिम मावळे - हाजी गफुर पठाण*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


शिवरायांचे आम्ही मुस्लिम मावळे - हाजी गफुर पठाण*

पुणे दिनांक -- छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य होते ,त्यावेळी लोककल्याण करणारे काम महाराजांनी केले .आज त्यांचा आदर्श घेऊन सर्वांनी कार्य केले पाहिजे .आणि मी महाराजांच्या जुन्नर जन्मभूमी तला आहे .त्यांच्या मावळ्यांमध्ये आमचे पूर्वज होते त्यामुळे आम्ही त्यांचे मावळे आहोत असे मत मुस्लिम फाऊंडेशन चे अध्यक्ष

व नगरसेवक हाजी गफू र पठाण यांनी शिवजयंती निम्मित आयोजित स्वच्छता अभियान प्रसंगी व्यक्त केले.

          छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित आज कोंढवा येथे आपला कोंढवा स्वच्छ कोंढवा मोहिमअंतर्गत स्वच्छ ता अभियान राबविण्यात आले .यावेळी माजी आमदार महादेव बाबर,माजी नगरसेवक नारायण लोणकर उपस्थित होते .यावेळी कोंढवा येथील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.