महाविकास आघाडी सरकारने तातडीने कर्जमाफी केल्याबद्दल व पीक विमा मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार करण्यात आला

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी व सोडवण्यासाठी आयोजित आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांचा दुसरा जनता दरबार महसूल विभाग, कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, महावितरण या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय कोपरगाव येथे आज पार पडला.*


यावेळी महाविकास आघाडी सरकारने तातडीने कर्जमाफी केल्याबद्दल व पीक विमा मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार करण्यात आला तसेच संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.


यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, तसेच महसूल, पोलीस स्टेशन, महावितरणचे अधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, सर्व संचालक, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*