घरोघरी सर्वेक्षणाचे कामकाज सोमवार पासून, --रुबल अगरवाल,अतिरिक्त महापालिका आयुक्त,( जनरल)

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
"घरोघरी सर्वेक्षणाचे कामकाज सोमवार पासून,
--रुबल अगरवाल,अतिरिक्त महापालिका आयुक्त,( जनरल)
पुणे महानगरपालिका परिसरात घरोघरी जावुन मनपातील पथके सोमवार,दिनांक १६/३/२० पासून सर्वेक्षण करणार असल्याचे मा,रुबल अगरवाल,अतिरिक्त मनपा आयुक्त,( जनरल ) यांनी कळविले आहे,
सद्धयस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधकरिता ( कंटेमनमेंट प्लॅन ) अंतर्गत करावयाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून सर्वेक्षण केले जाणार आहे,
मनपातील विविध अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश या पथकात आहे,यामध्ये आरोग्य निरीक्षक,समूह संघटिका,विभागीय आरोग्य निरीक्षक,वैद्यकीय अधिकारी,अशा विविध पदनिहाय कर्मचारी,अधिकारी यांचा समावेश आहे,
३०,कर्मचारी यांचे १ पथक असे सुमारे १२५ पथके तयार करण्यात आली असून संपूर्ण शहरात विशेषतः ज्या भागात प्रादुर्भाव अथवा परिस्थिती असेल अशा भागात तसेच गेली महिनाभरापासून परदेशातून पुण्यात आलेले देशी- परदेशी नागरिक यांची घरोघरी जाऊन भेटी घेणे,कोरोना संदर्भात माहिती देणे,कोरोना बाबत लक्षणे आढळल्यास, डॉ, नायडू रुग्णालयात तपासणी करणे, वैद्यकीय सल्ला,मार्गदर्शन घेणे,विलगीकण म्हणजे काय? 
घरी १४,दिवस विलगीकरण कसे करणे, याबाबतचे माहिती दिली जाणार आहे,याचबरोबर मनपाचे वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजना या सर्व प्रकारच्या बाबतीत माहिती देण्यात येऊन जनजागृती केली जाणार असल्याचे मा,रुबल अगरवाल, अतिरिक्त मनपा आयुक्त ( जनरल ) यांनी कळविले आहे,
--संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,