मुंबई-पुण्यासह पाच शहरांमधील थिएटर्स, जीम बंद; परीक्षांबाबत लवकरच घोषणा'

पुणे प्रवाह न्युज


 


मुंबई-पुण्यासह पाच शहरांमधील थिएटर्स, जीम बंद; परीक्षांबाबत लवकरच घोषणा'
___________________________________


राज्यात कोरोनाचे एकूण 17 रुग्ण असून त्यांना आयसोलेशन (विलगीकरण) वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये, एक ते दोन सोडून इतर सर्व दुबई, फ्रान्स व अमेरिकेतून आलेले आहेत. सुदैवाने या सर्वच रुग्णांना गंभीर स्वरुपाची लक्षणे दिसत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून महानगरातील काही संस्था आजपासून बंद राहतील, असे उद्धव ठाकरेंनी सांगतिले.  


सरकारकडून आज मध्यरात्रीपासून काही संस्था बंद करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये व्यायामशाळा, जीम, चित्रपटगृहे, नाट्येगृहे, जलतरण तलाव यांचा समावेश आहे. मात्र, हा नियम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरांनाच लागू करण्यात आला आहे. तसेच, पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील शाळा बंद करण्यात येत आहेत. मात्र, तेथील परीक्षा सुरळीतपणे आणि नियमित वेळापत्रकानुसार होणार आहेत, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.