बोपोडीत चढ्या भावाने गॅस विकणा-या एजन्सीच्या मालक-चालकासह चौघांवर गुन्हा*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*बोपोडीत चढ्या भावाने गॅस विकणा-या एजन्सीच्या मालक-चालकासह चौघांवर गुन्हा*


करोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन बोपोडी येथे तब्बल 410 रुपयांनी गॅस महाग विकणाऱ्या एजन्सीच्या मालकासह चौघांवर खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
त्यांच्याकडून पोलिसांनी 36 हजार 616 रुपयांचे 46 घरगुती गॅस, 12 हजार रुपये आणि दोन पॅगो तीनचाकी रिक्षा जप्त केल्या आहेत. बोपोडी येथील श्रीनाथजी गॅस एजन्सीचे मालक व  चालक   वर गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.


खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल भोसले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक गुन्हे शफिल पठाण तपास करत आहेत. गुरूवारी (दि. 26) बोपोडी येथील छाजेड पेट्रोल पंपाजवळ, भाऊ पाटील रस्तावर पोलिसांनी ही कारवाई केली. रस्त्यावर दोन पॅगो लावून 790 रुपये किंमतीच्या भारत गॅसची 1200 रुपयांच्या चढ्या भावाने विक्री करताना आढळून आले.
त्यानुसार पोलिसांनी चौघांवर अत्यावशक वस्तु अधिनियम सन 1955 कलम 3 आणि पाच नुसार गुन्हा दाखल केला आहे.