पत्रकार परिषदेत पुणे, कोल्हापूर, औरंगाबादमधील पत्रकारांनी ‘एबी आणि सीडी’च्या टीम सोबत केल्या दिलखुलास गप्पा!

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


एकाच शाळेत शिकलेले अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडे यांचे ‘एबी आणि सीडी’ हे टोपण नाव त्यांच्या शाळेतील शर्मा सरांनी ठेवले आहे... त्यांच्यातील मैत्री ही इतकी दाट होती की ‘एबी आणि सीडी’ नावाने ते ओळखले जात होते...',असे म्हटले जाते आणि हे महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांनी ट्रेलरमध्ये सुद्धा पाहिले आहे.


काही दिवसांपूर्वीच अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, मिलिंद लेले दिग्दर्शित आणि हेमंत एदलाबादकर लिखित ‘एबी आणि सीडी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता आणि २४ तासांच्या आत या ट्रेलरला तब्बल १ मिलियन पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले होते. कमी वेळेत ट्रेलरला मिळालेले इतके व्ह्युज आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद ही खरं तर सिनेमाच्या संपूर्ण टीमसाठी प्रेक्षकांनी दिलेली पोच पावती आहे.


ट्रेलरला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर ‘एबी आणि सीडी’ सिनेमाची  पत्रकार परिषदेत पुणे येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सिनेमाच्या टीमशी संवाद साधण्यासाठी आणि सिनेमाविषयी तपशिलात जाणून घेण्यासाठी या पत्रकार परिषदेत पुण्यातील पत्रकारांसह कोल्हापूर आणि औरंगाबद येथील पत्रकार देखील उपस्थित होते. सिनेमातील कलाकार विक्रम गोखले, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, सागर तळाशीकर, साक्षी सतिश, लोकेश गुप्ते, दिग्दर्शक मिलिंद लेले, लेखक हेमंत एदलाबादकर, संगीत दिग्दर्शक आशिष मुजुमदार आणि निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी मिडियाशी सिनेमाशी निगडीत अनेक किस्से शेअर करत त्यांच्याशी संवाद साधला.


जुन्या गोष्टी अडगळीत टाकल्या जातात तसे वृद्धापकाळात घरातील वृद्धांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. असेच काहीसे झाले आहे ७५ वर्षांच्या चंद्रकांत देशपांडे यांच्यासोबत. पण या कठीण परिस्थितीत त्यांच्या मदतीला फक्त त्यांचा मित्र धावून येतो आणि तो मित्र म्हणजे ‘एबी’ अर्थात ‘अमिताभ बच्चन’. अमिताभजींकडून आलेले एक पत्र ‘सीडी’ चंद्रकांत देशपांडेच्या आयुष्यात नवे, उत्सुकतेचे आणि आनंदाचे रंग भरायला मदत करते. एका पत्रामुळे सुरु झालेला ‘एबी आणि सीडी’चा याराना प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल हे मात्र नक्की.


सायली संजीव, अक्षय टंकसाळे, सुबोध भावे, साक्षी सतिश, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर या कलाकारांच्या सुंदर अभिनयाने नटलेला हा सिनेमा येत्या १३ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आणि हा सिनेमा आपल्या कुटुंबासह आणि मित्र परिवारांसोबत नक्की पाहा.