राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) सेवादल अध्यक्ष पदी श्री. महेश उत्तम झपके राहणार केसरीनगर, बोपखेल, पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष मा. श्री.दिपक मानकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रधान केले आहे. शहराध्यक्ष श्री. संजोग वाघेरे पाटील यांच्या शिफारशीनुसार श्री. महेश झपके यांना सेवादल अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे..
श्री. महेश झपके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कमिटीमध्ये चिटणीस या पदावर मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच ते शहरातील जुने व अभ्यासू कार्यकर्ते असून बोपखेल येथील भक्ती शक्ती मित्र मंडळच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात.