कष्टकऱ्यांच्या  मदतीला धावले मातोश्री सामाजिक संस्था पिंपरी चिंचवड शहर*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*कष्टकऱ्यांच्या  मदतीला धावले मातोश्री सामाजिक संस्था पिंपरी चिंचवड शहर*


*पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी. काळेवाडी फाटा. वाकड. थेरगांव. पिंपरीगांव. तापकिर मळा. रहाटणीगांव. परिसरातील घरोघरी केले धान्याचे वाटप…*


पिंपरी (दि. ३० ) – करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरु झाल्याने नागरिक कुटुंबासहीत घरातच आहेत. पण मजूरी करुन दररोज आपली उपजिविका भागवणारे कष्टकरी हे घरीच असल्याने कुटुंबाची उपजिविका भागवण्यासाठी हतबल झाले आहेत. मातोश्री सामाजिक संस्थेच्या संस्था यांनी सोशल डिस्टनसिंगची काळजी घेत संपूर्ण   परिसरात घरोघरी धान्याचे वाटप केले. 


 कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आले आहे व त्याचा वाढता संसर्ग रोखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देशासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील हातावर पोट असणऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. 


घरातील राशन अल्प असल्यामुळे या कष्टकऱ्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे . परंतु, अशा स्थितीत एकमेकांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहर माझ्या कुटुंबासारखेच आहे व त्यामुळे अन्नधान्याचे वाटप केले.


अन्न-धान्याचा पुरवठा नियमितपणे होणार असला तरी, तो खरेदी करण्यासाठी कष्टकऱ्यांच्या घरात पैसेच नाहीत, 


अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. संकटाच्या या परिस्थितीत ज्यांना शक्य आहे त्यांनी यथा शक्ती मदत करावी असे *आवाहन मातोश्री सामाजिक संस्था पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अध्यक्ष गणेश आहेर. नवनाथ (माऊली) जाधव. गणेश पाडूळे. गोरख पाटील. निलेश भोरे. रविकिरण घटकार.  शिल्पाताई अनपान. संजय गायके. बाळासाहेब गायकवाड. नरसिंग माने. गणेश वाळूंज. मारुती म्हस्के. दत्ता गिरी.आधिक भोसले   यांच्या वतीने करण्यात येत आहे*