कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील बंदींसाठी' विशेष दक्षता

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील बंदींसाठी' विशेष दक्षता
  पुणे, दिनांक 17-राज्यातील कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी बंदिस्त आहेत. सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झालेली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. तुरुंगातील बंदी जणांना त्याची लागण होऊ नये यासाठी न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार बंदी जणांना तात्पुरता जामीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा सुनील रामानंद यांनी दिली.                                                                                     सुनिल रामानंद म्हणाले, राज्यातील सर्व कारागृहांमध्ये पस्तीस हजाराहून अधिक बंदी बंदिस्त आहे येरवडा,  मुंबई सेंट्रल (ऑर्थर रोड) ठाणे आणि नाशिक या चार मध्यवर्ती कारागृहातील तसेच  इतर कारागृहातील किरकोळ व मध्यम स्वरूपाच्या गुन्हयातील बंद्यांना नियमित जामीन किंवा तात्पुरता जामीन उपलब्ध झाल्यास तुरुंगातील बंद्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल.  राज्यात 45 ठिकाणी साठ कारागृह आहेत. येथील एकूण क्षमता 24 हजार बंदी ठेवण्याची आहे. सध्या 38 हजार  बंदी ठेवण्यात आले आहेत.  कारागृहातील बंद्यांची तसेच त्यांना भेटावयास येणार्याा नातेवाईकांची आवक-जावक कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.  न्यायालयीन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फिजिकल प्रोडक्शन 100 टक्के थांबवून ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे करण्याची विनंती करण्यात आली आहे.
पैशाअभावी जामीन न मिळालेल्या बंद्यांसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार असल्याचे श्री रामानंद यांनी सांगितले.
 याशिवाय प्रिझन गेटमधून येणा-या प्रत्येकाची मेन गेटच्या बाहेरच वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या वैद्यकीय तपासणीमध्ये ताप,  खोकला, सर्दी अशी साधारण शारीरिक तपासणी असणार आहे. तुरुंगामध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर ही सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्दैवाने एखाद्या बंद्यास लागण झाल्यास त्याला स्वतंत्र आयसोलेटेड सेलमध्ये ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
0000


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image