विकासकामांमध्ये गुणवत्ता राखा - आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*विकासकामांमध्ये गुणवत्ता राखा - आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे*


राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत खोपडी येथे ५५.६० लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते करण्यात आले.


*यावेळी बोलताना आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे म्हणाले की, गावात विकासकामे होत असताना ग्रामपंचायतीसह नागरिकांनी कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष ठेवावे. महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करत आहे. ग्रामपंचायतींनी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावे, कोपरगाव मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.*


यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, जी.प. सदस्या सौ. सोनालीताई साबळे, सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, सुधाकर रोहोम, उपसभापती अर्जुन काळे, सदस्य मधुकर टेके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष चारुदत्त शिनगर, अॅड. जोशी, दादासाहेब साबळे, राहुल जगधने, प्रसाद साबळे, विस्तारअधिकारी दत्तात्रय रानमाळ, उपअभियंता उत्तम पवार, शाखा अभियंता श्री. सातपुते, सरपंच संभाजीराव नवले, उपसरपंच शिवाजीराव वारकर, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*