मुस्लिम आरक्षणासाठी अध्यादेश काढणार, नवाब मलिक यांची घोषणा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मुस्लिम आरक्षणासाठी अध्यादेश काढणार, नवाब मलिक यांची घोषणा
____________________________________


राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्यासाठा राज्य सरकारकडून लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मुस्लिमांना शिक्षण आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची तरतूद करणारा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी आज विधान परिषदेत दिली आहे.
आज प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढण्यात येईल. मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण लागू व्हावे, यासाठी लवकरात लवकर कायदा तयार करून आरक्षण लागू करण्याबाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्या अगोदर मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, हा सरकारचा प्रयत्न असल्याचे मलिक यांनी सांगितले. 
दरम्यान मुस्लिम समजाताली आमदारांनी मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारकडून उचलण्यात आलेल्या या पावलाचे स्वागत केले आहे.